नागपूर :- जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्रिणीसोबत हॉटेलात गेलेल्या तरुणाने रुममध्येच गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील नगरधन येथे ही घटना घडली आहे. मुकेश भोंडेकर (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मनसर येथे वास्तव्यास होता.
मुकेश हा मैत्रीनी सोबत नगरधन येथील एका हॉटेलमध्ये गेला होता. दोघेजण हॉटेलमध्ये गेल्यानंतर सोबत असलेली तरुणी ही बाथरूममध्ये गेली होती. यानंतर रूममध्ये एकटाच असल्याने मुकेशने ओढणीने गळफास लावत आत्महत्या केली.तरुणी बाथरूम मधून बाहेर आल्यानंतर मुकेशने गळफास घेतल्याचे दिसले. हे दृष्य पाहून घाबरलेली तरुणी रूममधून धावत बाहेर आली व घटनेबाबत हॉटेल मॅनेजरला सांगितलं.
घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस आल्यावर मुकेशला खाली उतरवत तात्काळ खाजगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलीस सगळ्या प्रकरणांमध्ये मुलीकडून घटनाक्रम जाणून घेतला. दरम्यान आत्महत्येचे कारण स्पष्ट झालं नसून नेमकं काय घडलं; याचा खुलासा शवविच्छेदन अहवालानंतर होईल. त्याशिवाय पोलिसही या सगळ्या प्रकरणात आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहे.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ