पाल ता रावेर l संतोष राठोड :- पाल पासून आठ किमी अंतरावरील सहस्त्रलिंग नजिक गांजा पेरलेल्या शेतात बुधवार रोजी रात्री एक वाजता पोलिसांनी छापा टाकुन शेतातील 91 किलो गांजा जप्त केला असून ऐकाला अटक करण्यात आली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात मिळाले माहिती अशी की, सहस्त्रलिंग येथील शेत शिवारात बंदी असलेली गांजाची झाडे अन्य पिकांच्या अडोष्याने एका शेतात पेरल्याची माहीती पोलिस प्रशासनाला मिळाली होती.
या अनुषंगाने पोलिसांनी सदर शेतात मध्यरात्री जाऊन छापा टाकला असता त्यांना शेतात लागवड केलेला 91 गांजाचे झाड आढळून आला. रात्री उशीरापर्यंत गांजा जप्त करून शेतातुन नष्ट करण्यात आले
पो हे को जगदीश पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी अक्रम कासम तडवी याच्यावर 1985 चे कलम 8 ब 20 क प्रमाणे कारवाई करण्यात आली
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग, तहसीलदार बंडू कापसे तसेच कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी भेट दिली.
पोलिस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल घटनास्थळी पो.उपनिरीक्षक सचिन नवले पो हवलदार कल्पेश अमोदकर,जगदीश पाटील सोबत दाखील होऊन शेतातील गांजा जप्त करून कारवाई करण्यात आली
मध्यप्रदेश राज्यात काही दिवसापूर्वी ही गांजा शेतीवर झाली होती कारवाई
काही दिवसापूर्वी पाल पासून पंधरा किमी अंतरावर मध्यप्रदेश सीमेवरील हरणकुडीया या आदिवासी पाड्यावर मकाच्या शेतात 2342 गांजाचे झाड असल्याचे पोलिसांना गुप्त माहिती मिळताच शेतातील गांजा जप्त करून ऐका आरोपीवर मध्यप्रदेश पोलिसांनी कारवाई केली होती
या गांजाच्या शेतीमागे महाराष्ट्र गुजरात राजस्थान सह अन्य शहरातील गांजा तस्कर आदिवासींना पैशाचा लालच देऊन त्यांच्या शेतात गांजाशेती करतात पहाडी क्षेत्र असल्याने कोणीही त्यांच्या पर्यंत पोहोचू शकत नाही याचाच फायदा घेत गांजा तस्कर गाजा लागवड करतात.
हे पण वाचा
- मोयखेडा दिगरला घरकुल नाही तर कुळघर/ घरकुल योजनेचा फज्जा; गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून सुद्धा समितीचा चौकशीकडे कानाडोळा.
- प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.
- एरंडोलला ट्रॅक्टरची चोरी,चोरटे फरार, २४ तासाच्या आत दुसरी मोठी घटना, एरंडोल पोलिसांना चोरट्यांना पकडण्याचे आवाहन.
- एरंडोल न.पा.च्या अकार्यक्षम -बेजबाबदार प्रशासना विरूध्द बेमुदत उपोषणदि. 21 जुलै 2025 पासून एरंडोल शहर संघर्ष समिती करणार प्रांत कार्यालयासमोर उपोषण