पत्नीने सासरी येण्यास नकार दिल्याने दोघात झाला वाद,पतीच्या राग अनावर झाल्याने पत्नीसह अकरा महिन्याच्या चिमुकलीची केली हत्या.

Spread the love

पतीने कमरेला दगड बांधून विहिरीत उडी घेऊन केली स्वतःची सुद्धा संपविली जीवनयात्रा.

जामनेर : तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे अंगाला थरकाप उडविणारी दुहेरी हत्याकांडाची घटना शुक्रवारी (ता. १२) उघडकीस आहे. पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीसह अकरा महिन्याच्या चिमुकलीची हत्या केली.त्यानंतर दुधलगाव (ता. मलकापूर) येथे जाऊन विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे जामनेर तालुका हादरला असून, देऊळगाव गुजरी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

देऊळगाव गुजरी येथील पोलिस पाटील राजू इंगळे यांची कन्या प्रतिभा हिचा विवाह दुधलगाव येथील विशाल मधुकर झनके याच्याशी झाला होता. पतीला मद्याचे व्यसन असल्यामुळे छोटी, मोठी कुरबुर व्हायची. परंतु त्यातच पतीचे दारूचे व्यसन जास्तच झाल्यामुळे प्रतिभा पतीला सोडून अकरा महिन्याच्या मुलीला सोबत घेऊन माहेरी निघून आली होती. मध्यंतरी विशालने प्रतिभाची समजूत घालण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. परंतु प्रतिभाने त्यास नकार दिला होता.

शुक्रवारी प्रतिभाचे आई-वडील शेतात गेले असताना विशाल प्रतिभाला घेऊन जाण्यासाठी व तिची समजूत काढण्यासाठी आला असता प्रतिभाने चक्क नकार दिल्यामुळे दोघांमध्ये वाद पेटला. त्यामुळे विशालचा राग अनावर झाल्यामुळे विशालने धारदार शस्त्राने प्रतिभा व मुलगी दिव्या या दोघींची हत्या करून तिथून फरार झाला. प्रतिभाच्या आई, वडिलांना माहिती मिळताच त्यांनी घरी धाव घेतली. त्यांना आपली मुलगी व नात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने दिसून आले.

पोलिसांचा तपास सुरू

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच जळगाव येथील अतिरिक्त पोलिस आयुक्त पाचोरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी व फत्तेपूर पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी देऊळगाव येथे घटनास्थळी गाव घेतली. तसेच पत्नी व चिमुकल्या मुलीची हत्या करून पतीने आपल्या मूळ गावी दुधगाव येथे कमरेला दगड बांधून विहिरीत उडी घेऊन आपली स्वतःची सुद्धा जीवनयात्रा संपविली. रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश फड. आणि तडवी आदी तपास करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार