सोलापूर :-माढा तालुक्यातील कुर्डूवाडीनजीक कव्हे येथे स्वतःच्या चिमुकल्या मुलाचा कुऱ्हाडीने निर्घृणपणे खून करून स्वतः विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या विवाहितेच्या कृत्याचा उलगडा महिन्यानंतर झाला आहे.आपले लग्नापूर्वीचे प्रेमप्रकरण सासरच्या मंडळींना कधी ना कधी समजेल, या भीतीपोटी त्या विवाहितेने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे
कौशल्या ऊर्फ कोमल चोपडे या निष्ठुर आईनेच स्वत:चा पोटचा मुलगा प्रणव गणेश चोपडे (वय ६) याचे शरीर कुऱ्हाडीने छाटून दोन तुकडे करून निर्घृण खून केला आणि नंतर स्वतः विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात नोंद झाला होता. कोमल ही रुग्णालयात उपचारानंतर अखेर शुद्धीवर आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोमल ही आरोग्यदृष्ट्या सक्षम असल्याचा अभिप्राय दिल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन अटक केली.
तिने गुन्ह्याची कबुली दिली. घटनेच्या दिवशी प्रथम सतत टीव्ही पाहतो काय म्हणून मुलगा प्रणव याचा गळा आवळला. नंतर तो मेला की नाही याची खात्री करण्यासाठी त्याला हलवून पाहिले. परंतु आपण आत्महत्या केल्यानंतर मुलगा नाहीच मेला तर, असा विचार करून तिने कुऱ्हाडीने त्याच्या शरीराचे दोन तुकडे केले. लग्नापूर्वीचे आपले प्रेमप्रकरण सासरी आज ना उद्या कधी तरी समजणार, या भीतीपोटी कोमल हिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.