डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एरंडोलला विविध कार्यक्रम.

Spread the love

एरंडोल :- येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात मोटार सायकल रॅली मिरवणूक यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शहरासह ग्रामीण भागात विविध शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील,प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड,तहसीलदार सुचिता चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे,सहाय्यक निरीक्षक गणेश
अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल,

माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,रवींद्र महाजन,किशोर निंबाळकर,राजेंद्र चौधरी, दशरथ महाजन,यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील,माजी उपनगराध्यक्ष प्रा.मनोज पाटील,निवृत्त तहसीलदार अरुण माळी,माजी नगरसेवक जगदीश ठाकूर, यांचेसह विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या पदाधिका-यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून युवकांनी विविध घोषणा देवून मोटार सायकल रॅली काढली.

रॅलीत सहभागी झालेल्या युवकांच्या मोटारसायकलवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले निळे ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.सायंकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती.शहरातील प्रमुख रस्त्यांवर मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम शांततेत पार पडले.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी नगरसेवक बबलू चौधरी,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे,माजी सरपंच बाळासाहेब पाटील,संभाजी पाटील,कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन,समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन,डॉ.राहुल वाघ, प्रमोद पाटील, डॉ.सुरेश पाटील,डॉ.के.ए.बोहरी, डॉ.फरहाज बोहरी, डॉ.राहुल पाटील,डॉ.संग्राम पाटील, मिलिंद पवार,प्रा,नरेंद्र गायकवाड,मेडिकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डॉ.सुधीर काबरा,अरुण नेटके,मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय चौधरी, प्रा.शिवाजीराव अहिरराव,कमरअली सय्यद, सुधीर शिरसाठ,आबा महाजन,नितीन ठक्कर यांचेसह समाजबांधव,महिला,युवक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.कार्यक्रमासाठी उत्सव समितीच्या पदाधिका-यांनी सहकार्य केले.

हे पण वाचा

टीम झुंजार