जळगाव : उन्हाळ्याचे दिवस असल्याने उष्णता व गर्मी वाढली आहे. यामुळे घराघरात कुलरचा वापर देखील वाढला आहे. अशाच प्रकारे दुपारच्या सुमारास कुलर सुरु करताना विजेचा जोरदार झटका बसून १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील किनोद या गावी घडली. किनोद (ता. जळगाव) येथे आई व दोन बहिणींसह वास्तव्यास असलेली अक्षदा किशोर मोरे (वय १२) या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. उन्हामुळे दुपारी गरम होत असल्याने घरामध्ये लावलेला पत्र्याचा कुलर सुरू करण्यासाठी अक्षदा ही गेली.
तिने कुलर सुरु करण्यासाठी बटन सुरू करत असताना तिला विजेचा जोरदार धक्का लागल्याने ती फेकली गेली. घरात असलेल्या तिच्या आईला हा प्रकार दिसताच तिने आरडाओरड केली. आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक धावून आले. यानंतर अक्षदाला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. येथे तपासणी करून वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.