यावल :- तालुक्यातील अंजाळे या गावाजवळ मोर नदीचे पात्र आहे. या नदी पात्रात पुलाखाली अवैद्यरीत्या जेसीबीच्या साह्याने गौण खनिज उत्खनन होत असल्याची गोपनिय माहिती फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना मिळाली होती तेव्हा त्यांनी यावल पोलीस व त्यांच्या पथकाला संयुक्तरीत्या कारवाईचे आदेश दिले.
तेव्हा अंजाळे येथील मोर नदीच्या पुलाखाली मंगळवारी सकाळी १० वाजेला यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे, हवालदार अनिल इंगळे, गणेश ढाकणे, अशोक बाविस्कर,वासुदेव मराठे सह पोलिसांचे पथक दाखल झाले. तेथुन जेसीबी क्रमांक टी. एस. ०१ ई. एल.७२३९ तसेच डंपर क्रमांक एम.एच.२७. एक्स १५३७, डंपर क्रमांक एम.एच.१९. सी. व्ही. ७०९८, डंपर क्रमांक एम.एच.१९ झेड.५८०४, आणी ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. ३७ एल. ५९७३ असे एक जेसीबी सह तीन डंपर व एक ट्रक्टर, ट्रॉली या पथकाला मिळून आले.
पथकाने संपूर्ण वाहनं तसेच चोरलेली एक ब्रास वाळू असा एकुण २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. व याप्रकरणी सहायक फौजदार नितीन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात किशोर अशोक शंकपाळ रा.अंजाळे, रोहित लीलाधर जाधव रा.राहुल नगर भुसावळ, धनराज शांताराम सपकाळे रा अंजाळे, विलास मुरलीधर कोळी रा.कठोरा, अजय खच्चर, शुभम कालू घोरपडे, शुभम दिलीप सपकाळे, कालू विठ्ठल घोरपडे तिघे रा. अंजाळे व विशाल भावलाल साळवे रा. रमाईनगर अकलुद या नऊ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहे.या कारवाईमुळे जळगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






