मुंबई :- देहविक्रेय करणाऱ्या तरुणीबरोबर प्रेमात पडल्यानंतर नग्नावस्थेत केलेल्या डान्सचा व्हिडीओ लपूनछपून शूट करुन एका 54 वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार मुंबई उघडकीस आला आहे. गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणामध्ये एका 21 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी पीडित 54 वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल करत होती. या व्यक्तीला नग्नावस्थेतील एका व्हिडीओ त्याला दाखवून पैसे उकळण्याचा हा तरुणीचा प्रयत्न होता. या तरुणीला अन्य एक महिला या कामात मदत करत होती. तरुणीने या व्यक्तीकडे 10 लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच आपण हा व्हिडीओ सार्वजनिक करु नये असं वाटत असेल तर 10 लाख अथवा 8 तोळा सोन्याचं ब्रेसलेट मला दे अशी मागणी या तरुणीने पीडित व्यक्तीकडे केलेली.
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ अपलोड करुन…
या तरुणीने केलेल्या मागण्या मान्य करण्यास सदर व्यक्तीने नकार दिल्यानंतर तिने बनावट नावाने इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केलं. या अकाऊंटवरुन तिने हे व्हिडीओ अपलोड केले आणि या 54 वर्षीय व्यक्तीच्या निकटवर्तियांबरोबर सदर व्हिडीओची लिंक शेअर केली. यानंतर पीडित व्यक्तीने गोरेगाव पोलिसांकडे तक्रार केली. फेब्रुवारी महिन्यामध्ये या व्यक्तीने पहिल्यांदा या प्रकरणात तक्रार दाखल केल्यापासून पोलीस तपास करत होते. या प्रकरणामध्ये सर्व पुरावे आणि माहिती गोळा केल्यानंतर पोलिसांनी रविवारी म्हणजेच 7 एप्रिल 2024 रोजी या महिलेला अटकत केली. या महिलेला अटक करुन कोर्टासमोर सादर करण्यात आलं असता तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती एका सुरक्षा एजन्सीमध्ये काम करते. ही व्यक्ती अंधेरीमधील चार बंगला परिसरात वास्तव्यास आहे.
तिने नग्नावस्थेत नाचण्यास भाग पाडल्याचा दावा
या प्रकरणात ज्या 54 वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल केलं जात होतं त्या व्यक्तीने 2021 साली कामाठीपुरामधील वेश्यालयाला भेट दिली होती. त्याने येथील एका तरुणीबरोबर संबंध ठेवले आणि नंतर तो तिला अनेकदा वेगवेगळ्या भेटवस्तू द्यायचा. दिवसोंदिवस हे दोघे अधिक जवळ येत गेले. या व्यक्तीने गोरेगावमध्ये एक घर भाड्याने घेतलं जिथे हे दोघे वरचेवर भेटायचे. एकदा या तरुणीबरोबरच अन्य एका देहविक्रेय करणाऱ्या महिलेला आपण या घरी बोलावलं होतं. त्यावेळेस या महिलेने नग्नावस्थेत नृत्य सादर केलेलं. तिने आपल्यालाही नग्नावस्थेत नाचण्यास भाग पाडलं असं या व्यक्तीने नोंदवलेल्या जबाबामध्ये म्हटलं आहे. हा सारा प्रकार त्या तरुणीने गुपचूपपणे आपल्या न कळत तिच्या मोबाईल कॅमेरात कैद केल्याचा आरोप या व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे.
8 तोळ्याचं ब्रेसलेट दे
काही दिवसांनी या व्यक्तीच्या ओळखीतील लोकांना हा व्हिडीओ पाठवण्यात आला. या व्यक्तीला त्याच्या एका मित्रानेच तुझा हा व्हिडीओ तुझ्याबरोबर गोरेगावच्या घरी येणाऱ्या तरुणीने आपल्याला पाठवल्याची माहिती दिली. मागील आठवड्यात ही तरुणी पीडित व्यक्तीला गोरेगावमध्ये भेटली आणि आपल्याला 10 लाख रुपये किंवा 8 तोळ्याचं सोन्याचं ब्रेसलेट नाही दिलं तर व्हिडीओ सार्वजनिक करेल अशी धमकी दिली होती. त्याने याला नकार दिल्यानंतर तिने इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडीओ अपलोड केला. पोलिसांनी या प्रकरणामध्ये आयपीसीबरोबरच आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन घेतला आहे.
हे पण वाचा
- मतदार संघातील जनतेचे भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ :-डॉ.संभाजीराजे पाटील
- धरणगावातील, म्हसावद व बोरणार येथील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश ;म्हसावद व बोरणार येथे ऊ.बा. ठा. गटाला मोठा धक्का
- गुलाबराव पाटील येणून जास्तीत जास्त “मतेशी जीकान लायर “- बंजारा तांडा वासियांचा निर्धार !
- भीषण अपघात! बस दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू; प्रवाशांनी खिडकीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला, पण…’ पहा व्हिडिओ
- गुलाब भाऊंचा विजयच आमच्यासाठी खऱ्या भाऊबीजेची भेट’! विदगाव – फुपणी परिसरातील लाडक्या बहिणींचे भावनोद्गार !