एक प्रियकर अंधाराच्या फायदा घेत रात्रभर गर्लफ्रेंडसोबत तिच्या घरी…. तिच्या कुटुंबीयांनी पकडले रंगेहाथ पुढे काय? झालं वाचा.

Spread the love

गोरखपूर : उत्तर प्रदेशात एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल असं प्रकरण उघडकीस आलं. प्रियकर रोज रात्री अंधाराचा फायदा घेऊन लपून-छपून प्रेयसीसोबत राहण्यासाठी तिच्या घरी जात होता. सकाळच्या वेळेस आसपासचे लोक झोपेतून जागे व्हायच्या आत तो तिथून पलायन करायचा. एक दिवस त्याच्या या कृत्याचा भांडाफोड झाला.उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये रात्रीच्या वेळी एक व्यक्ती त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी येत असे. एक दिवस ग्रामस्थांनी या प्रियकराला रंगेहाथ पकडलं. त्यांनी प्रियकराला मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. रात्रभर पोलीस ठाण्यात त्याची चौकशी चालली. हा युवक ज्या युवतीला लपूनछपून भेटायला येत होता, तिच्याशी त्याने विवाह केला पाहिजे, असा निर्णय चौकशीअंती झाला.

युवकदेखील लग्नाला तयार झाल्यावर त्याला पोलीस ठाण्यातून सोडण्यात आलं.सहजनवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे प्रकरण घडलं. एक प्रियकर त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी रोज रात्री तिच्या घरी येतो, अशी कुणकुण ग्रामस्थांना लागली होती. तो रात्रभर तिच्यासोबत राहून सकाळी निघून जात असे. गुरुवारी (4 एप्रिल) रोजच्याप्रमाणे तो प्रेयसीला भेटण्यासाठी आला असता गावातल्या लोकांनी त्याला पकडून मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. याबाबत गिडाचे सीओ अनुराग सिंह यांनी सांगितलं, की युवक आणि युवती दोघंही प्रौढ आहेत. चौकशीनंतर दोघांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरपूर-बुदहट पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या युवकाचं आजोळ सहजनवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे. तो त्याच्या आजोळी कायम येत असे. त्याचे परजातीतल्या युवतीशी प्रेमसंबंध जुळले. तो सातत्याने तिच्याशी मोबाइलवरून बोलत असे आणि बाहेर भेटायला बोलवत असे. जेव्हा त्यांचं नातं अधिक घट्ट झालं तेव्हा तो प्रेयसीच्या घरी तिला भेटण्यासाठी लपूनछपून जाऊ लागला. कोणी पाहू नये यासाठी तो नेहमी रात्रीच्या वेळी प्रेयसीच्या घरी जात असे. प्रेयसी देखील तो यायच्या वेळेला घराचा दरवाजा खुला ठेवत असे. रात्रभर बेडरूममध्ये दोघं सोबत राहत. सकाळ झाल्यावर तो तिच्या घरातून बाहेर पडत असे.

असा प्रकार बरेच दिवस सुरू होता; पण काही जणांनी एक-दोन वेळा त्याला तिच्या घरातून बाहेर येताना पाहिल्यावर तिच्या कुटुंबीयांना ही गोष्ट सांगितली. त्यानंतर युवतीच्या कुटुंबीयांनी युवकाला रंगेहाथ पकडण्याची तयारी सुरू केली.रात्रीच्या वेळी सगळे जण झोपलेले असताना, तो युवक हळूच तिच्या रूममध्ये गेला. त्या वेळी कुटुंबातल्या एका सदस्याला जाग आली. त्याला शंका आल्याने त्याने कुटुंबातल्या इतर सदस्यांना झोपेतून उठवलं आणि रूमच्या बाहेर लाठ्या-काठ्या घेऊन दबा धरून बसले.

बराच वेळ रूमचं दार वाजवल्यावर दार उघडलं असता आत त्यांना युवक दिसला. त्यांनी युवकाला मारहाण सुरू केली. तोपर्यंत गावातले इतर लोकही घटनास्थळी पोहोचले. मारहाण केल्यावर पोलिसांना फोन करून बोलवण्यात आलं. पोलीस युवकाला घेऊन स्टेशनमध्ये आले. गावातले इतर लोक, युवतीचे कुटुंबीयदेखील तिथे पोहोचले. युवकाचे नातेवाईकही पोलीस स्टेशनमध्ये आले. रात्रभर दोन्ही गटांत जोरदार वादविवाद झाला. सकाळी दहा वाजता, भलेही युवती अन्य जातीची असली तरी युवक तिच्याशी कोर्टात विवाह करील यावर एकमत झालं. दोन्ही गटांनी याला मान्यता दिल्यावर पोलिसांनी युवकाला सोडून दिलं.

हे पण वाचा

टीम झुंजार