प्रतिनिधी l एरंडोल :- शहराचा आठ ते दहा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा हा चार दिवसाआड करावा व स्वच्छ पाणी मिळावे याबाबत जळगाव जिल्हा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.मनोज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी एरंडोल नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.
निवेदनात एरंडोल शहरात सध्या आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असुन सदर पाणीपुरवठा गढूळ, दूषित,दुर्गंधी युक्त असल्याचे म्हटले आहे तसेच २०२३ साली भर उन्हाळ्यात मृतसाठा असूनही चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याचे म्हटले आहे परंतु सध्या अंजनी मध्यम प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असुन लामंजन पाईप लाईन नगर पालिकेकडे उपलब्ध असुन देखील एरंडोल नगर पालिका नागरिकांना वेठीस धरत असल्याचे म्हटले आहे.यामुळे पाणी शिल्लक असताना देखील नागरिकांना पाणीटंचाई चा सामना करावा लागत असल्याचे म्हटले आहे
शेवटी पंधरा दिवसात जर आठ ते दहा दिवसांनी होणारा पाणीपुरवठा हा चार दिवसाआड झाला नाही,स्वच्छ पाणी मिळाले नाही तर मी उपोषणाला बसणार असल्याचे म्हटले आहे. निवेदन देण्यासाठी युवा सेना जिल्हाध्यक्ष प्रा.मनोज पाटील, बापू मराठे,भैय्या लोहार,अमोल तंबोली, बंटी शिरवाणी,गणा चौधरी,नरेश भोई,सोनू ठाकूर,भैया ठाकूर, सचिन पाटील,अमोल धोबी, भानुदास आरखे,दिलीप सोनवणे,निलेश चौधरी, ईश्वर पाटील, भुषण भोई,हरिष गांगुर्डे,चेतन मराठे ,रोहीत राजपूत, मयुर मराठे आदी उपस्थित होते.
हे पण वाचा
- आजचे राशी भविष्य बुधवार दि.१९ मार्च २०२५
- Viral Video: दोन महिला शिक्षिकांमध्ये आधी वाद मग एकमेकांचे कपडे फाडत, झिंज्या उपटत शाळेतल्या मुलांसमोर फ्री स्टाईल हाणामारी, पहा व्हिडिओ.
- खळबळजनक! आधी दोन्ही अल्पवयीन मुलांची हत्या करून आई-वडिलांनी संपविली जीवन यात्रा, मृत्यूआधीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील.
- औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, एरंडोल प्रांताधिका-यांना दिले निवेदन.
- महिलेच्या पर्समधील ७ लाख ८० रुपये किमतीचे सोने चोरणाऱ्या दोघं महिलाना अमळनेर पोलिसांनी केली अटक.