लखनऊ : लग्नाचा दिवस प्रत्येक नवरी आणि नवरदेवासाठी अतिशय खास असतो. मात्र, कधीकधी लग्नातच अशा काही घटना घडतात, ज्या सगळ्यांच्याच नेहमी लक्षात राहतात. एका लग्नसमारंभात अशीच एक अतिशय विचित्र घटना घडली.यात वरमाळेच्या कार्यक्रमादरम्यान अचानक नवरी बेशुद्ध झाली. नवरी बेशुद्ध पडताच मंडपात एकच गोंधळ उडाला. तर दुसरीकडे वऱ्हाडीही वेगवेगळ्या चर्चा करू लागले. उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात वधू अचानक बेशुद्ध पडल्याची ही घटना घडली.
बेशुद्ध झालेल्या नववधूला तिच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून, तिच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.कडक उन्हाचा परिणाम महोबामध्ये दिसू लागला आहे. विवाह सोहळ्याच्या आनंदात वरमाळेचा कार्यक्रम सुरू असताना मध्येच नववधू अचानक बेशुद्ध पडली. कुटुंबीयांनी वधूला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. वधूच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, त्यांची मुलगी सकाळपासून उपवास करत होती आणि यावेळी खूप उष्णता होती. कदाचित त्यामुळेच तिची तब्येत अचानक बिघडली असावी.
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तिच्यावर उपचार करत असून, ती लवकरच बरी होईल.महोबा जिल्हा रुग्णालयाच्या बेडवर असलेल्या नवविवाहितेला पाहण्यासाठी लग्नाच्या पाहुण्यांनी मोठी गर्दी केली होती. लग्नघरातून वधू अचानक गायब झाल्याच्या बातमीने लोकांना धक्का बसला. लग्नाची मिरवणूक येताच वधूचे कुटुंब अचानक कुठे आणि कसे गायब झाले याचं प्रत्येक पाहुण्याला आश्चर्य वाटलं. मात्र जिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डमध्ये तीव्र उष्णतेनं त्रस्त झालेल्या वधूवर उपचार सुरू असल्याचे पाहून सर्वच वऱ्हाडी आणि वधूच्या नातेवाईकांना सत्य समजलं. डॉक्टरांनी वधूला सांगितलं की, ती अति उष्णतेमुळे बेशुद्ध झाली होती.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ