जयपूर : वरातीत किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये नाचताना अचानक मृत्यू झाल्याच्या बऱ्याच घटना आजकाल समोर येतात. सध्या अशीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात भाच्याच्या लग्नात डोक्यावर मडकं घेऊन नाचताना अचानक मामा खाली कोसळला आणि त्यांचा मृत्यू झाला.घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर लग्नाचा आनंद क्षणात दुःखात बदलला.राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील नवलगढ भागातील लोछवा येथील धानी येथून हे प्रकरण समोर आलं आहे.
इथं लग्नसोहळ्याचं शोकाकुलात रूपांतर झालं. कमलेश 20 एप्रिल रोजी आपल्या भाच्याच्या लग्नासाठी कुटुंबीयांसह लोछवाच्या धानी येथे आले होते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही विधी पूर्ण झाल्यानंतर कमलेश कुमार डोक्यावर मडकं घेऊन आनंदाने नाचत होते. यावेळी अचनाक ते खाली पडले. यानंतर कमलेशला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कार्डियक अरेस्टमुळे मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आहे. लग्नात आलेल्या मामाच्या आकस्मिक निधनाने लग्नाच्या आनंदाचं दुःखात रूपांतर झालं. संपूर्ण घरात शोककळा पसरली. मामाच्या अंत्यसंस्कारानंतर भाच्याचा विवाह सोहळा पार पडला.
कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या व्यक्तीचं हृदय धडधडणं थांबतं आणि ते शरीराच्या इतर भागांना रक्तपुरवठा करू शकत नाही, तेव्हा त्या स्थितीला कार्डियाक अरेस्ट म्हणतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला कार्डियाक अरेस्ट येतो तेव्हा तो काही मिनिटांतच बेशुद्ध होतो. त्यावर तातडीने उपचार न मिळाल्यास त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो
हे पण वाचा
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.
- रस्त्याने जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर ठार मारेन; धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक.
- निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू.
- अल्पवयीन मुलीशी केली मैत्री,फूस लावून बसविले एक्स्प्रेसमध्ये अन् धावत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये नेऊन नराधमाने केला लैंगिक अत्याचार.