पाचोरा:- शहरातील आदर्श प्राथमिक विद्या मंदिरातील मुख्याध्यापकास सेवा समाप्तीचे पत्र देण्यास गेलेल्या डॉक्टर महिलेचा विनयभंग करत वडिल व भावाला मारहाण केल्याची घटना २२ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे.घटनेप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात एका विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, नरेंद्र शंकर जोशी (वय – ५४ वर्ष) रा. विवेकानंद नगर, पाचोरा हे येथील आदर्श प्राथमिक विद्या मंदिरात मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत.
मात्र नुतन महिला सर्वोदय बाल विकास संस्था, पाचोरा जा. क्रं. १३१ / नु. म. प्रा. शा. / २०२३ – २०२४ दि. २० एप्रिल २०२४ अन्वये आदर्श प्राथमिक विद्या मंदिरातील मुख्याध्यापक नरेंद्र शंकर जोशी यांची दि. २२ एप्रिल २०२४ पासुन सेवा समाप्त झाली असल्याचे पत्र २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास डॉ. अनुजा प्रतापराव तावरे ह्या गेल्या असता नरेंद्र जोशी यांना त्याचा राग आल्याने नरेंद्र जोशी यांनी डॉ. अनुजा तावरे यांना धक्काबुक्की करत त्यांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत असतांना
डॉ. अनुजा तावरे यांचे वडिल प्रा. प्रतापराव तावरे व भाऊ डॉ. रोहीत तावरे हे घटनास्थळी येवुन वाद मिटवत असतांनाच नरेंद्र जोशी यांनी डॉ. रोहीत तावरे यांच्या उजव्या कानाचा चावा घेतला. तसेच प्रा. प्रतापराव तावरे यांना देखील शिविगाळ करत चापटाबुक्यांनी मारहाण केली. डॉ. रोहीत तावरे यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर शाळेचा घंटा मारुन जखमी केले. डॉ. अनुजा तावरे यांच्या फिर्यादीवरून नरेंद्र शंकर जोशी यांचे विरुध्द पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल दिलीप वाघमोडे हे करीत आहे.
हे पण वाचा
- भरधाव वाहनाच्या ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ३ मोटरसायकलींना चिरडलं ५ जणांचा मृत्यू एकाची प्रकृती चिंताजनक.
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेची साथ
- मनसेला खिंडार – जिल्हा उपाध्यक्षांसह कार्यकर्ते शिवसेनेत दाखल नशिराबाद, चिंचोली व धानवड येथील कार्यकर्त्यांनी स्वीकारले गुलाब भाऊंचे नेतृत्व
- जळगाव लोकसभेच्या महिला आघाडीच्या समन्वयकपदी शितल चिंचोरे यांची निवड; शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला सत्कार !
- आजचे राशी भविष्य शनीवार दि. २ नोहेंबर २०२४