बंगळुरू : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एका व्यक्तीला मारहाण केली जात आहे. हा धक्कादायक व्हिडीओ बंगळुरूतील आहे. ज्यात पत्नी पतीचा व्हिडीओ बनवत आहे. हे शेजारणीला समजताच ती चप्पल घेऊन धावत आली आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे पाहुयात.व्हिडीओत तुम्ही पाहू शकता दोन लोक एका व्यक्तीला मारत आहेत. त्याला मारत असताना ते लोक एका कारकडे बोट दाखवत आहेत. व्यक्ती स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करते पण ते लोक त्याला लाथा मारून जमिनीवर ढकलून देतात. या व्हिडीओत एक महिला या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवताना दिसते आहे. ही महिला ज्या व्यक्तीला मारहाण केली जाते आहे त्याची पत्नी असल्याचं सांगितलं जातं आहे.
नेमकं घडलं काय?
ही घटना कर्नाटकच्या बंगळुरूतील असल्याचं सांगितलं जातं आहे. रोहिणी आणि सहिष्णू अशी या पीडित दाम्पत्याची नावं आहेत. एक दिवसापूर्वीच ते या परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहायला आले होते. त्यांची चूक इतकीच की त्यांनी शेजाऱ्यांच्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी आपली कार पार्क केली ही त्याची चूक होती, असं सांगितलं जातं आहे. यावेळी हल्लेखोरांच्या गटात असलेल्या महिलेला तिचा व्हिडिओ बनवत असल्याचं समजलं. तिनं त्या महिलेचा चप्पल हातात घेऊन पाठलाग केली आणि तिला मारहाण केली.
तेथे उपस्थित असलेल्या इतर शेजाऱ्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आरोपींना अटक
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. कलम 354, 324 आणि 506 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
हे पण वाचा
- मेहुणीने स्वतःच्या लग्नात दाजीसोबत दिली अशी पोझ की भावोजी सापडले अडचणीत, अटक होण्याची आली वेळ.
- ‘अर्ध्यावरती डाव मोडीला’…. ‘अधुरी एक प्रेम कहाणी’; अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे तरुण विवाहितेचा शॉक लागून मृत्यू
- भडगांव तालुक्यातील कजगांव शिवारातील शेतातील विहीरीत आढळला २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह.
- गावठी कट्टा बाळगल्या प्रकरणी एरंडोल तालुक्यातील एकास अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
- Viral Video: एका महिलेच्या दिल्ली मेट्रोत बेभान मादक डान्स, पाहून नेटकरी चक्रावले पहा व्हिडिओ