लखनऊ : वरात दारात आल्यावर वर वधूला आणि वधू वराला पाहण्यासाठी उत्सुक होते. लग्न मंडपात पोहोचताच नवरदेवाची नजर तिला शोधत असते तर नवरीबाईच्या त्याच्यावरच नजरा टिकलेल्या असतात. नवरीचा उत्साह इतका असतो की ती मोठमोठ्याने आपल्या नवरदेवाला हाकही मारते.असे कितीतरी व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. अशीच एक नवरी जिनं वरात दारात येताच प्रेमाने आपल्या नवरदेवाला फोन केला अन् नंतर लग्नच मोडलं.उत्तर प्रदेशच्या फिरोजाबदमधील शिकोहाबादची ही घटना आहे.
नई आबादी, हिमायपूर नागला पाचिया येथील शिवसागरचं लग्न नीम खेरिया गावातील फूलमतीसोबत ठरलं. मंगळवार, 23 एप्रिल रोजी लग्नाची वरात शिवसागर फूलमतीच्या घरी पोहोचला. वरात पाहताच नवरीने नवरदेवाला फोन केला. पण असं काही घडलं की नवरीनं लग्नाला नकार दिला. आल्या पावली वरात परत गेली.
नेमकं घडलं काय?
लग्नाची वरात जेव्हा दारात आली तेव्हा ती पाहून वधू पक्षाला आश्चर्य वाटलं. कारण या वरातीत ना बँड होता ना घोडी. वर कारमध्ये वधूच्या दारात पोहोचला. लग्नाच्या मिरवणुकीत बँड आणि घोडी काही नाही आणलं हे वधूनं वराला विचारलं. यावेळी वराने आपल्याला शिवागीळा केल्याचा आरोप वधूनं केला आहे. वराच्या या कृत्याने वधू संतप्त झाली आणि तिनं सात फेरे घेण्यास नकार दिला.
वरपक्षानं वधूची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि तिनं लग्न मोडलं. वधूने सांगितलं की, वराने फोनवर तिच्याशी गैरवर्तन केलंं. लग्नाआधीच तो असं वागत असेल तर लग्नानंतर काय करेल. पण लग्न का करायचं.
पंचायत भरूनही मोडलं लग्न
दरम्यान दोन्ही पक्षांनी पंचायत बोलावली होती, 21 एप्रिलला लगून-टिकामध्ये देखील बुफेच्या वेळी वराने आपल्या कुटुंबातील सदस्यांचा अपमान केला होता, असं वधूनं सांगितलं. रात्री दोन्ही पक्षांनी पंचायत बोलावली मात्र प्रकरण मिटलं नाही. शेवटी, व्यवहाराच्या करारावर पोहोचल्यानंतर दोन्ही पक्ष वेगळे झाले.
वधूने लग्नास नकार दिल्याने वराला हताश झाला. त्याच्या नव्या आयुष्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. वराला वधूशिवाय लग्नाच्या मिरवणुकीने रिकाम्या हाताने परतावं लागलं.
- मारुती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या दोघांना डंपरची जोरदार धडक,दुचाकीस्वार तरुण ठार तर मित्र गंभीर जखमी.
- एरंडोल येथे वैफल्यग्रस्त ३८ वर्षीय युवकाची गळफास घेवून संपविले जीवन.
- मोयखेडा दिगरला घरकुल नाही तर कुळघर/ घरकुल योजनेचा फज्जा; गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून सुद्धा समितीचा चौकशीकडे कानाडोळा.
- प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन
- जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक; ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भडगांव पोलिसांची कारवाई.