एका ५० वर्षीय व्यक्तीचे गावातील एका महिलेसाेबत अनैतिक संबंधातून सहा जणांनी डोळ्यांत मिरची टाकून गळा आवळून केला खून.

Spread the love

लातूर: तालुक्यातील चोंडी येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा गावातील सहा जणांनी डोळ्यांत मिरची टाकून, काठीने मारून, दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत वाढवणा (बु.) पोलिस ठाण्यात शुक्रवारी दुपारी सहा जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाेघा आराेपींना अटक करण्यात आली असून, पाच दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे. 

पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील चोंडी येथील सूर्यकांत ऊर्फ बाबू सुदाम बिरादार (वय ५०) यांचे गावातीलच एका महिलेसाेबत अनैतिक संबंध हाेते. याच अनैतिक संबंधाच्या कारणावरून शुभम ऊर्फ छकुल्या संजीव बिरादार, बालाजी ऊर्फ पप्प्या संजीव बिरादार, केवळबाई संजीव बिरादार, कचरू जीवन डोईफोडे, लक्ष्मण जीवन डोईफोडे, विलास जीवन डोईफोडे (सर्व रा. चोंडी, ता. उदगीर) यांनी संगनमत करून डोळ्यांत मिरची पूड टाकून, काठीने मारहाण करीत दोरीने गळा आवळून खून केला.

याबाबत वाढवणा (बु.) पाेलिस ठाण्यात शामराव शिवाजी वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण सहा जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. यातील संशयित शुभम ऊर्फ छकुल्या संजीव बिरादार, बालाजी ऊर्फ पप्प्या संजीव बिरादार या दाेघांना अटक करण्यात आली, तर तिघेजण पसार झाले आहेत. ताब्यात घेतलेल्या दाेघांना उदगीर न्यायालयात शुक्रवारी हजर केले असता, पाच दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक भीमराव गायकवाड यांनी दिली.

हे पण वाचा

टीम झुंजार