लग्नाच्या मंडप सजला, नवरदेव नवरीला लागली हळद, मेहंदीच्या कार्यक्रम सुरू असतांनाच 10 मिनिटांत नवरदेवाचा दुर्देवी मृत्यू!

Spread the love

कोटा (राजस्थान):- लग्नाचा सिझन सुरू आहे. लग्न म्हण्टलं की वधू- वराकडील मंडळींमध्ये उत्साहाच वातावरण असतं. मात्र अशावेळी अनेकदा दुर्घटना काही घडून उत्साहाचं वातावरण दुखाच्या वातावरणात बदलतं. राजस्थानमधील कोटा येथे असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. कोटा जिथे एका रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या लग्नाच्या विधी दरम्यान वराचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वधू-वरांचा हळदी मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक कूलरच्या वायरिंगला विजेचा धक्का लागल्याने वराचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

नेमकं काय घडल

मिळालेल्या माहितीनुसार, कोटा येथील केशवपुरा भागात राहणाऱ्या सूरज सक्सेनाचे आज लग्न होते. शहराबाहेरील असलेल्या एका रिसॉर्टमध्ये लग्नाचे कार्यक्रम सुरू होते. यावेळी वरवधू यांच्यासहीत सगळे पाहुणे मंडळी उपस्थित होते. सायंकाळी लग्नाची मिरवणूक निघणार होती. रिसॉर्टच्या स्विमिंग पूलजवळ हळदीचा कार्यक्रम सुरू होता तर जवळच नववधू तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या नावाने मेहंदी लावत होती. त्यावेळी अचानक वराला कुलरमधील वायरमध्ये लागलेल्या वायरमधून विजेचा धक्का लागला. काही कळायच्या आताच त्याने या जगाचा निरोप घेतला.

दोन्ही कुटुंबियांना बसला धक्का

या घटनेनं लग्नस्थळी एकच गोंधळ उडाला. कुणाला काहीकी समजलं नाही नेमकं झालं काय. वराच्या कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेलं मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. या घटनेनं दोन्ही कुटुंबियांना धक्का बसला असून लग्नघरी असणारं चैतन्याचं वातावरण दुखात बदललं आहे. तर वधूही रडत रडत वधू बेशुद्ध पडली. संध्याकाळी त्यांच लग्न होणार होतं, लग्नाची मिरवणूक घेऊन वर येणार होता, पण आता त्याच वराची अंत्ययात्रा निघणार आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार