जळगाव शहरातून 3 मुलांची आई एका मुलास घेवून बेपत्ता; हवालदिल पिता 2 मुलांना सांभाळून दोन महिन्यापासून मारतोय पोलिसात चकरा.

Spread the love

जळगाव :- शहरातील दूध फेडरेशन राजमालती नगरातील २६ वर्षीय विवाहिता सात वर्षीय मुलांसह दोन महिन्यांपासून बेपत्ता झाली आहे. पोलिसांत हरविल्याची तक्रार देऊन पत्नी व मुलाचा शोध लागत नसल्याने हवालदिल पिता रोज पोलिस ठाण्याच्या चकरा मारत आहे.जळगाव शहरातील दूध फेडरेशन राजमालतीनगरात मिथुन जाधव (वय ३५) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. रेल्वे मालधक्क्यावर हमाली करून ते कुटुयबाची गुजराण करतात.

त्यांची पत्नी शारदा जाधव (वय २६) बचत गटाचे पैसे भरायला जाते, असे सांगून मुलगा रूपेश (वय ७) याला घेऊन घरातून गेली. ती अद्याप परत आलेली नाही. याबाबत शहर पोलिसांत हरविल्याची तक्रार नोंदवून दोन महिने उलटले, तरी पोलिसांना या महिलेचा शोध घेता येत नसल्याने मिथुन जाधव नियमितपणे पोलिस ठाण्यात चकरा मारून चौकशी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुलांचे एकाकीपण पाहावेना

मिथुन जाधव यांना तीन मुले असून, पत्नी शारदा निघून गेल्यानंतर दोन्ही मुले त्यांच्याजवळच राहतात. दिवसभर मालधक्यावर हमाली करून थकून भागून आल्यावर घरी मुलांसाठी स्वतःला स्वयंपाक करावा लागतो.मुलांना त्यांच्या आईची ओढ असून, त्यांचे प्रश्न बेजार करणारे व निरुत्तर करून जातत. साधारण एक ते दीड वर्षापूर्वी पत्नी शारदा अजय दिलीप जाधव (रा. संभाजीनगर, कैकाडी वाडा, रावेर) याच्यासोबत निघून गेली हेाती.

आताही त्याच्यासोबत निघून गेल्याचे मी वारंवार पोलिसांना सांगितले. गावात इतरांना ती त्याच्यासोबत दिसते. मात्र, पोलिसांना तिचा शोध लागत नाही. ती माझ्या सोबत राहण्यास तयार नसेल, तर किमान पोलिसांनी तसे लिखित पत्र मिळवून द्यावे, अशी विनवणी मिथुन जाधव यांनी केली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार