लखनऊ : लग्नाचं एक विचित्र प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. ज्यात नवरदेवाला आपली एक चूक इतकी महागात पडली की नवरीने लग्नच मोडलं. उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंडमधील महोबा येथे ही घटना घडली. लग्नसमारंभात वरमाळेनंतर सात फेरे सुरू असतानाच मद्यधुंद वराने वधूच्या आत्यासोबत फ्लर्टिंग करण्यास सुरूवात केल्याने लग्नात खळबळ उडाली.मद्यधुंद वराच्या कृत्यामुळे त्रासलेल्या नवविवाहित वधूने लग्नासच नकार दिला.एवढंच नाही तर वधूकडील लोकांनी पोलिसांकडे तक्रार करून नवरदेवावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
श्रीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या हल्के अहिरवार यांची मुलगी करीनाचा विवाह मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील पानपुरा गावात सुनील कुमार यांचा मुलगा दीपक याच्यासोबत निश्चित झाला होता. 25 एप्रिल रोजी दीपक लग्नाच्या वरातीसह गावात पोहोचला. जिथे वरमाळेसोबत लग्नाचे इतर विधी सुरू होते.त्यानंतर वराच्या एका कृत्याने लग्नसमारंभात व्यत्यय आणला.
मंडपात सात फेरे सुरू होते. तेव्हाच वराने वधूच्या आत्यासोबत फ्लर्टिंग सुरू केलं. मग काय, हे पाहून नवरी संतापली. तिने लगेचच नवरदेवाशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. वधूच्या नाराजीनंतर विवाह सोहळ्यातील सर्व विधी थांबवण्यात आले. हे प्रकरण स्थानिक पोलीस ठाण्यात पोहोचलं. पोलीस प्रशासनाने समजावण्याचे बरेच प्रयत्न केले. मात्र, नवरी या वराशी लग्न करण्यास स्पष्ट नकार देत आहे. नवरदेवाचे कुटुंबीय मात्र त्याच तरुणीसोबत आपल्या मुलाचं लग्न लावण्यावर ठाम आहेत.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……