रायगड:- काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यामध्ये आता तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आईने या लेकरांना संपवल्याचे आता समोर आले आहे.याबाबत माहिती अशी की, अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरुन जन्मदात्या आईनेच पोटच्या लेकरांचा गळा दाबून त्यांचा खून केला आहे. अलिबाग तालुक्यातील किहिम येथे ही घटना घडली आहे.
जन्मदात्या आईनेच पोटच्या एक नाही तर दोन्ही लेकरांचा जीव घेतला. याप्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले. शितल सदानंद पोले (वय २५) असे आरोपी महिलेचे नाव आहे. या घटनेने मात्र सगळेच हादरले आहेत.याबाबत माहिती अशी की, अनैतिक संबंधात ही दोन्ही मुलं अडथळा ठरत होती. आईचा एक प्रियकर देखील होता. प्रियकरासाठी आईने पोटच्या मुलांना संपवले. पाच वर्षांची आराध्या सदानंद पोले आणि तीन वर्षाचा सार्थक सदानंद पोले अशी त्यांची नावे आहेत. आईवर मोठ्या विश्वासाने बागडणाऱ्या त्या चिमुकल्यांना केवळ प्रियकरासाठी तिने ठार मारले अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
दरम्यान, आरोपी शितल पोलेचे गावाकडील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तिला त्याच्यासोबत संसार थाटायचा होता. अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.आईच्या प्रियकराला मुलं नको होती. मुलगी आराध्या आई सतत फोनवर बोलत असल्याचे वडिलांना सांगत होती. याचा राग आईला आला. अनेकदा प्रियकर भेटायला आल्यावर ही लहान मुलं त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण करत होती.यामुळे आईने दोन्ही मुलांच्या नाकातोंडावर कपडा बांधला आणि हाताने तोंड दाबून त्यांचा श्वास कोंडला. तिने मोठ्या शिताफिने मुले झोपेतच बेशुद्ध झाल्याचा कांगावा केला. मात्र पोलीस तपासात ही भयंकर माहिती समोर आली आहे.
हे पण वाचा
- Viral Video: पोलीस स्टेशनबाहेरच गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये जोरदार राडा; दोघांनी एकमेकांना धु धु धुतले पहा धक्कादायक व्हिडिओ.
- पैशाच्या लालसेपोटी सेवानिवृत्त परिचारीकेच्या केला होता खून; या गुन्ह्यातील ३० लाखांची रक्कम नातेवाईकांना केली परत.
- शेअर मार्केटिंगसाठी लोकांकडून पैसे का घेतो असे बोलण्याच्या राग आल्याने धरणगावात वृद्ध आजीवर नातवाने केला हल्ला. अज्ञाताने हल्ला करून पळून गेल्याच्या केला बनाव.
- पारोळा शिवारात 40 वर्षीय महिलेचा डोक्यात दगड टाकून खून;महिलेची ओळख पटली,आरोपी गजाआड, पारोळा पोलिसांची कामगिरी
- दोघांच्या लग्नाला झाली १३ वर्षे, अचानक महिलेस भेटला तिच्या प्रियकर, दोघांच्या मनावर राहिला नाही ताबा अन् मग पतीने असे केले की……