CCTV VIDEO: भरदुपारी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घुसले घरात, पण माय-लेकीने मोठ्या हिमतीने केला सशस्त्र दरोडेखोरांचा सामना पहा व्हिडिओ.

Spread the love

या घटनेच्या व्हिडिओ पाहून तुम्हीही ‘नारी शक्ती’ला सलाम कराल.

CCTV VIDEO: हैंदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील बेगमपेट परिसरातील एका घरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दोघे बंदुकीसह घरात शिरले. यावेळी घरामध्ये महिला आणि तिची मुलगी उपस्थित होत्या.त्या दोघींनी मिळून आरोपीचा मोठ्या हिमतीने सामना केला. आरोपीच्या हातात बंदूक असूनही त्या दोघी त्याला घाबरल्या नाहीत. ही संपूर्ण घटना घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातत कैद झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरत्न जैन आणि त्यांची पत्नी अमिता, हे मेहोत रसुलपुरा येथील पैगा हाऊसिंग कॉलनीत कुटुंबासह राहतात. गुरुवारी दुपारी 2 च्या सुमारास अमिता, तिची मुलगी आणि मोलकरीण घरात होत्या. यावेळी प्रेमचंद आणि सुशील कुमार नावाचे व्यक्ती कुरिअर देण्याच्या बहाण्याने घरात आले.

अमिताने दोघांनाही दाराबाहेर थांबायला सांगितले, पण हेल्मेट घातलेला सुशील कुमार घरात घुसला आणि त्याने अमितावर बंदूक रोखली. यानंतर प्रेमचंद याने मोलकरणीच्या मानेवर गळ्यावर लावला.यानंतर अमिता आणि तिच्या मुलीची आरोपी सुशीलसोबत झटापट झाली. दोघींचा आवाज ऐकून शेजारी धावत आले, मात्र तोपर्यंत सुशील तेथून फरार झाला.

तर, प्रेमचंदने चाकूचा धाक दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक लोकांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. यानंतर पोलिसांनी सुशील कुमार यालाही काझीपेठ येथून ताब्यात घेतले.यानंतर अमिताच्या तक्रारीवरून बेगमपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महत्वाची बाब म्हणजे, हा दरोडा पूर्वनियोजित होता.

एक वर्षापूर्वी दोघेही अमिताकडे काम मागण्यासाठी आले होते. त्यांनी काही काळ काम केले, तेव्हा त्यांना घरात ठेवलेल्या मौल्यवान वस्तूंची माहिती मिळाली. यानंतर ते तेथून पळून गेले आणि वर्षभरानंतर दरोडा टाकण्याच्या उद्देशानेच परत आले. या घटनेनंतर पोलिस उपायुक्त (उत्तर) रोहिणी प्रियदर्शिनी यांनी अमिता आणि तिच्या मुलीचा गौरव केला. या घटनेचा व्हिडिओ पाहून तुम्हीही ‘नारी शक्ती’ला सलाम कराल.

हे पण वाचा

टीम झुंजार