काकु व तिच्या प्रियकरास चिमुकलीने नको त्या अवस्थेत पाहिले; घरात इतरांना सांगेल म्हणून, दोघांनी चिमुकलीस……… अन् …….

Spread the love

लखनौ (उत्तर प्रदेश) : काकुला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर दोघांनी मिळून चिमुकलीचा खून केला आणि मृतदेह घराजवळ पुरला होता. पोलिसांनी गुन्ह्याचा शोध लावला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.प्रियकरासोबत असलेले अनैतिक प्रेमसंबंध लपवण्यासाठी काकुनेच पुतणीचा खून केल्याची धक्कादायक घटना अलिगढ भागात घडली आहे. या हत्याकांडात तिचा प्रियकरही सामील होता. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काकुने प्रियकरासह चिमुकलीला मारून घराजवळच पुरले होते.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रकरणाचा छडा लावला आणि चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी काकु आणि तिच्या प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहेत.आईने नकार दिलेला असतानाही काकु या चिमुकलीला जबरदस्तीने सोबत घेऊन गेली होती. मात्र थोड्यावेळाने एकटीच कपडे बदलून घरी आली. बराच वेळ झाला तरी मुलगी कुठेच दिसत नव्हती. चिमुकलीच्या आई-वडिलांनी तिचा शोध घेण्यास सुरवात केली.

चिमुकली कोठेही आढळून न आल्यामुळे याबाबत पोलिसांत तक्रार दिली होती.पोलिसांना चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, काकुकचे अनैतिक प्रेमसंबंध सुरू होते. प्रियकरासोबत काकीला नको त्या अवस्थेत या चिमुकलीने पाहिले होते. तिने याबाबत घरातील इतर कोणाला सांगू नये म्हणून काकीने थेट तिच्या हत्येचा कट रचला. प्रियकराच्या साथीने तिला ठार मारून घराजवळच पेंड्यात पुरले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार