एका सूनेच चक्क आपल्या सासूवर जडलं प्रेम, समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी करू लागली ब्लॅकमेल, पतीला मागितला घटस्फोट.

Spread the love

लखनऊ : प्रेम, कधी, कोणावर आणि कसं होईल, हे सांगता येत नाही, असं म्हणतात. प्रेमात माणूस सगळं विसरतो. चूक बरोबर यातला फरक कळणंही बंद होतं. आता प्रेमाची एक अजब आणि अनोखी कहाणी समोर आली आहे.यात एका सूनेला चक्क आपल्या सासूवर प्रेम जडलं आहे, इतकंच नाही तर यामुळे तिला आपल्या पतीला घटस्फोट द्यायचा आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील आहे. ज्यात पहिल्याच नजरेत सूनेचं सासूवर प्रेम जडलं.एवढंच नाही तर सून सासूच्या प्रेमात इतकी वेडी झाली आहे की तिला तिच्या नवऱ्यासोबत राहायचं नाही.

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सुनेला सासूशी संबंध ठेवायचे आहेत. सुनेला कंटाळून सासूने अधिकाऱ्यांकडे मदतीसाठी धाव घेतली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बुलंदशहरमधील एका गावात राहणाऱ्या एका महिलेने अधिकाऱ्यांकडे मदत मागितली आणि सांगितलं की, तिच्या सुनेला तिच्यासोबत संबंध ठेवायचे आहेत. याला विरोध केल्यास सुनेनं आत्महत्या करण्याची आणि घरात भांडणं करण्याची धमकी दिली आहे. महिलेचं म्हणणं आहे की, तिची सून आपल्या पतीसोबत राहू देऊ इच्छित नाही. तिची सून तिला सांगते की, तू फक्त माझी आहेस. आता तुझं संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत घालव.

2 वर्षाआधी लग्न –

सासूने सांगितलं की, त्यांच्या मुलाचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालं आहे. यानंतर सून घरात आली, सून घरात आल्यानंतर सून सासूवर संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकू लागली. महिलेने सांगितलं की, तिच्या सुनेला तिच्यासोबत समलैंगिक संबंध ठेवायचे आहेत. सुनेवर आरोप करताना महिलेनं सांगितलं की, सुनेने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचाही प्रयत्न केला होता. तुला भूल देऊन तुझ्यासोबत सर्व काही करेन, यानंतर तुला समाजात तोंड दाखवता येणार नाही, अशी धमकी तिच्या सुनेनं दिल्याचा आरोप महिलेनं केला आहे.

पतीसोबत राहण्यात रस नाही

महिलेचं म्हणणं आहे की, तिच्या सुनेला तिच्या मुलासोबत राहण्यात रस नाही. महिलेनं सांगितलं की, तिची सून म्हणते की मला तुमच्या मुलामध्ये रस नाही. महिलेनं सांगितलं की, जेव्हा तिने आपल्या सुनेला आपलं आयुष्य आता काहीच दिवसांचं असल्याचं सांगितलं, तेव्हा सुनेनं सासूला म्हटलं की, तुझ्यासोबत मीही माझा जीव देईन.

हे पण वाचा

टीम झुंजार