पुणे :- प्राॅप्रर्टी संपत्तीसाठी लोकं आपल्याचं लोकांचाही विश्वासघात करून त्यांच्या जीवावर उठू शकतात. पुण्यातही असाच एक प्रकार घडला असून स्वत:च्या मुलेच्या हत्येसाठी सुपारी देणाऱ्या नराधम पित्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे आठवड्याभरापूर्वी पुण्यातील जंगली महाराज रोडवर भरदिवसा एका बांधकाम व्यावसायिकावर पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पुणे पोलिसांनी 6 जणांना अटक करून या घटनेचा खुलासा केला आहे.
एका इसमाने त्याच्याच मुलाला मारण्यासाठी 75 लाखांची सुपारी दिली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 6 जणांना अटक करून या घटनेचा खुलासा केला आहे. संपत्तीवरून सुरू असलेल्या वादावरूनच एका पित्याने हे पाऊल उचलले आणि तो मुलाच्या जीवावर उठला.
मुलाच्या मनमानी कारभारामुळे वैतागले होते वडील
याप्रकरणी वडील दिनेशचंद्र अरगडे, प्रशांत घाडगे, अशोक ठोंबरे, प्रवीण कुडले, योगेश जाधव, चेतन पोकळे यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी वडील दिनेशचंद्र हे त्यांचा मुलगा धीरज अरगडे याच्या मनमानी वागणुकीमुळे नाराज होते. त्याच्या या वागण्याच्या त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत होता. एवढंच नव्हे तर कौटुंबिक कारण आणि मालमत्तेच्या वादामुळेही पिता-पुत्राच्या नात्यात तणाव वाढला होता.
हल्लोखोरांनी बंदूक तर चालवली पण…
हत्येच्या प्रयत्नानंतर फिर्यादी धीरज अरगडे यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. 16 एप्रिल रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास ते जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाईट्स बिल्डिंगजवळ असताना हा हल्ला झाला. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी धीरज यांच्यासमोर पिस्तुल ताणले आणि गोळीबारही केला. पण ती गोळी पिस्तुलामध्येच अडकली अन् धीरज यांचा जीव वाचला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी केला गुन्ह्याचा उलगडा
याप्रकरणी धीरज यांनी तक्रार दाखल केल्यानंतर क्राइन ब्रांचच्या टीमने कसून तपास सुरू केला. त्यादरम्यान पोलिसांनी परिसरातील आणि बिल्डींगजवळील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच धीरज अरगडे आणि सर्व नातेवाईकांची कसून चौकशी देखील पोलिसांकडून करण्यात आली. धीरज आणि त्यांचे वडील दिनेशचंद्र अरगडे यांच्याच कौटुंबिक कारण आणि संपत्तीच्या मुद्यावरून वाद सुरू होते, याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यासंदर्भात अधिक तपास केल्यावर धीरज यांच्या हल्ल्यामागे त्यांच्या वडीलांचाच हात असल्याचे धक्कादायक सत्य समोर आलं. तरजची हत्या करण्यासाठी त्यांचे वडील दिनेशचंद्र यांनी हल्लेखोरांना तब्बल 75 लाख रुपयांची सुपारी दिली. याप्रकरणी पोलिसांनी दिनेशचंद्र अरगडे यांच्यासह 6 लोकांना अटक केली आहे.
हे पण वाचा
- माता तू वैरीण!अविवाहित महिलेचे प्रियकरासोबत शारीरिक संबंध दोनवेळा प्रेग्नंट, जन्मताच रडत्या बाळांना संपवलं… प्रियकर स्वतः गेला पोलिसात.
- राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीष महाजन यांचा शिक्षक समन्वय संघ जळगाव,च्या वतीने आभार पर सत्कार.
- रस्त्याने जाणाऱ्या महिलेला भररस्त्यात गाठून माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर ठार मारेन; धमकी देणाऱ्या आरोपीला 24 तासाच्या आत अटक.
- निवासी शाळेतून मुलीचा शाळेचा दाखला काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक व त्यांच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत मृत्यू.
- अल्पवयीन मुलीशी केली मैत्री,फूस लावून बसविले एक्स्प्रेसमध्ये अन् धावत्या रेल्वेत टॉयलेटमध्ये नेऊन नराधमाने केला लैंगिक अत्याचार.