दुचाकी व कारची समोरासमोर धडक, दोघांच्या जागेवरच मृत्यू, कार चालक किरकोळ जखमी.

Spread the love

सावदा प्रतिनिधी (प्रशांत सरवदे)- मंगळवार रोजी दुपारी ५ वाजता बाईक व कार अपघात झाला. सावदा-पाल महामार्गावर चिनावल येथील बाईक स्वार व होंडा कंपनीची कार यांचा अपघात होऊन बाईक वरील दोघे जागीच ठार झाले. घटनास्थळी पोलीस उपस्थित उपस्थित झाले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. या अपघातात चिनावल येथील वीरेंद्र सुनील नेमाडे वय २७ व अनिल चुडामन मेढे वय ६५ यांचा मृत्यू झाला. हिरो होंडा कंपनीची बाईक फॅशन प्लस एम एच १९ ए बी ११०१ व होंडा कंपनीची ग्रे रंगाची बी आर व्ही एम एच १९ डी एम ० ३५१ या गाडीचा अपघात जबरदस्त झाला असून जागेवरच दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात कार चालक एअर बॅग मुळे बचावले असून किरकोळ जखमी झाले आहे त्याच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व त्यांचे सहकारी यांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टम करता रवाना केला. यावेळी मृतांच्या नातेवाईक यांनी टाहो फोडला. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान, घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक तडवी आणि सहकाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.

हे पण वाचा

टीम झुंजार