चुरू (राजस्थान) :- जिल्ह्यात राहणाऱ्या 18 वर्षीय तरुणीसोबत लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. प्रकरणातील पीडिताने तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दलची भयंकर स्थिती उलगडून सांगितली.
राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात राहणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणीसोबत लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणीचे अपहरण करत तीन जणांनी तिला एका हॉटेलमध्ये नेल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराचे व्हिडीओ काढले आणि जबरदस्तीने विष पाजून एका अज्ञात ठिकाणी फेकून दिले.
यानंतर पीडित तरुणीला एका व्यक्तीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेची पोलिसांना माहिती देत पीडित तरुणीने म्हटले की, तिच्यासोबत लैंगिक शोषण करण्यात आले आहे. या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणीच्या काकांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी बीएडचे शिक्षण घेत असून शिकण्यासाठी तारानगर येथील महाविद्यालायत जाते. 30 एप्रिलला घरातून बाहेर पडल्यानंतर पीडित तरुणी पुन्हा घरी परतलीच नाही. त्याच दिवशी रात्री पीडित तरुणी रुग्णालयात असल्याचे कळले.
पीडित तरुणीने सांगितली स्थिती
पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले की, महेश कुमार नावाच्या एका व्यक्तीने आपल्या दोन मित्रांसोबत एका हॉटेलवर जबरदस्तीने नेले. यानंतर हॉटेलवर सामूहिक बलात्कार करत काहीतरी पिण्यास दिले, खरंतर ते विष होते असे पीडित तरुणीने सांगितले.पीडित तरुणीला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेले असता तेथे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी पीडित तरुणीचा मृतदेह कुटुंबाकडे सोपवा आहे. या घटनेवर गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






