लखनऊ: उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिल्ह्यातील कप्तानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाच्या खुनाप्रकरणी पोलिासंनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी तरुणाची पत्नी, तिचा प्रियकर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.ज्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलोक परदेशात गेला होता, तिनेच तो मायदेशी परतल्यावर प्रियकरासह मिळून त्याचा खून केला. तिने अत्यंत क्रूर पद्धतीने आलोकला संपवलं जामुनीबरवा येथील रहिवासी असलेल्या आलोक प्रताप सिंहचं अर्चना उर्फ रीना सिंहशी दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं.
दोघेही आनंदाने जगत होते, पण अर्चना गावातल्या रजनीश सिंहला भेटली आणि कथेत ट्विस्ट आला. अर्चना-रजनीशचं प्रेम फुलू लागलं, अर्चनाच्या प्रेमात पडल्यानंतर रजनीशची आलोकशी मैत्री झाली आणि त्याच्या घरीही जाणं सुरू झालं. दरम्यान, आलोकने पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी परदेशात जाण्याचा विचार सुरू केला तेव्हा रजनीशने त्याला मदत केली आणि त्याला दुबईचा वर्किंग व्हिसा मिळवून दिला.
पती-पत्नीप्रमाणे राहत होते रजनीश-अर्चना
आलोक पैसे कमवण्यासाठी दुबईला गेल्यावर त्याची पत्नी अर्चना आणि रजनीश यांना भीती उरली नाही. आधी लपून भेटणारे दोघेही नंतर उघडपणे भेटू लागले. अर्चना रजनीशसोबत पतीपत्नीप्रमाणे राहू लागली. जवळपास वर्षभर दुबईत राहून आलोक घरी परतला तेव्हा अर्चना आणि रजनीशसाठी तो अडचणीचा ठरू लागला. त्यामुळे त्यांनी एक भयंकर कट रचला. आलोकला मारण्यासाठी अर्चनाने सर्वात आधी रजनीशला संध्याकाळी घरी बोलावलं.
रजनीशने आलोकशी मैत्री केली होती, त्यामुळे दोघेही रात्री नऊ वाजेपर्यंत बोलत राहिले. यानंतर अर्चनाने चहा बनवला आणि आलोकच्या चहामध्ये गुपचूप नशेचं औषध मिसळलं. चहा पिऊन आलोक बेशुद्ध झाला. यानंतर रजनीशने त्याचा दुसरा मित्र रियाजुद्दीनच्या मदतीने आलोकला बेशुद्धावस्थेत दुचाकीवर बसवलं आणि नंतर धौरा कालव्याजवळ रस्त्यात झोपवलं आणि डोक्यात हातोड्याने वार करून त्याचा खून केला.
घटनेचा उलगडा कसा झाला
रस्ते अपघातात आलोकचा मृत्यू झाला असं भासवण्यासाठी तिघांनी कट रचला होता, पण सकाळी त्याच्या मृत्यूबद्दल कळाल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. रजनीश व अर्चनाने पोलिसांपासून बचावासाठी खूप प्रयत्न केले, सिम कार्डही बदलले, पण सत्य लपू शकलं नाही. पोलिसांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट तपासल्यावर त्यांना प्रकरण समजलं. त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यावर दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींनी या घटनेला रस्ता अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलीस तपासात सत्य उघडकीस आलं. आलोकची हत्या करणारा रजनीश, रियाजुद्दीन आणि त्याला मदत करणारी त्याची पत्नी अर्चना यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती एएसपी अभिनव त्यागी यांनी दिली.
हे पण वाचा
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले