Viral Video: ‘पुढे रुग्णालय आहे. शांतता राखा’ रस्त्यावरून जाताना अशा सूचनांचे फलक रुग्णालय परिसरात सर्रास पाहायला मिळतात. रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून यामुळे अशा परिसरातून जाताना गाड्यांचे हॉर्न वाजविण्यास, मोठमोठ्याने डीजे, ढोल वाजविण्यास मज्जाव केला जातो.
तसेच रुग्णालयातही शांततेचे पालन केले जाते. पण सध्या सोशल मीडियावर रुग्णालयातील एका धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात भर रुग्णालयात ढोलाच्या तालावर डॉक्टर आणि नर्स नाचताना दिसतायत. तर, रुग्ण जोरजोरात ओरडत आहेत. या व्हिडीओवर आता अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
समाजमाध्यमावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील हापूरमधील एका सरकारी रुग्णालयातील आहे. त्यात रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स ढोल-ताशांवर बेभान होऊन नाचताना दिसत आहेत. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी रुग्णांना सोडून आतील वॉर्डमध्ये जाऊन नाचत असल्याचे दिसतेय. हापूर जिल्ह्यातील गढ रोडवर असलेल्या कम्युनिटी हेल्थकेअर सेंटरमधील ही घटना आहे.एक महिला कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनिमित्त डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात निरोप समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी भर रुग्णालयात ढोल-ताशांच्या गजरात सर्व कर्मचारी नाचत होते. त्यात रुग्णालयातील उच्च अधिकारी सहभागी होते की नाही हे अद्याप उघड झालेले नाही. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता केली जात आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टर रुग्णालयात ढोल-ताशांवर नाचताना दिसत आहेत. अशा प्रकारे कर्मचारी आणि डॉक्टरांनी रुग्णांना वेठीस धरत होते. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांनी ढोल-ताशांच्या मोठ्या आवाजाने त्रास होत असल्याची तक्रार केली; मात्र तरीही कर्मचारी आणि डॉक्टर ढोल वाजवीत नाचत राहिले. सरकारी रुग्णालयात नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे.
रुग्णालयातील कर्मचारी निर्लज्जपणे सर्व नियमांचे उल्लंघन करून उपचारासाठी आलेल्या रुग्णांना त्रास देत होते. या प्रकरणानंतर संबंधित रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
हे पण वाचा
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.