यावल : तालुक्यातील कोळवद येथील माहेर असलेल्या ३० वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिने पतीला मोटरसायकल घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे याकरिता छळ केला व पैसे आणले नाही म्हणून फारकत देऊन मोकळी हो अशी धमकी देत तिला माहेरी सोडून दिले. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोळवद ता. यावल येथील माहेर असलेल्या नशिबा फिरोज तडवी वय ३० या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात शनिवारी दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह विवरे बुद्रुक ता. रावेर येथील फिरोज अरमान तडवी यांच्यासोबत १९ मे २०१३ रोजी झाला होता. विवाह नंतर पती तिच्या चरित्रावर संशय घेऊ लागले व तिला शिवीगाळ करून मारहाण करू लागले व फारकत देऊन मोकळी हो असे सांगू लागले.
तसेच माहेरच्या लोकांनी पतीला मोटरसायकल घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे म्हणून तिचा छळ सुरू केला व तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. व तिला माहेरी सोडून दिले. तेव्हा सदर विवाहितेने वरिल दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात फिरोज अरमान तडवी, हसीना अरमान तडवी, सलमा आसिफ तडवी, असिफ तडवी, महमूद अरमान तडवी रा.विवरे बुद्रुक या पाच जणाविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.
हे पण वाचा
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.