लखनऊ : लग्नाचं एक अतिशय विचित्र प्रकरण समोर आलं आहे. यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांतच नवरी प्रियकरासह पळून गेली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील सहजनवा पोलीस स्टेशन परिसरातून समोर आली आहे.लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांतच नवरी प्रियकरासह पळून गेली. मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणीचं 21 एप्रिल रोजी सिक्रीगंज पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणाशी लग्न झालं होतं.
विधीनुसार लग्नानंतर 10 दिवसांनी मुलीला माहेरच्या घरून निरोप दिला जातो, त्यामुळे मुलगी घरीच होती आणि बाकीचे विधी चालू होते. तेव्हाच अचानक नवरी ृ गायब झाली. नवरी बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. सुरुवातीला त्यांनी आपापल्या स्तरावर शोध घेतला मात्र मुलगी कुठेच न मिळाल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठले. कुटुंबीयांनी गावातील विनय यादव या तरुणावर मुलीला पळवून नेल्याचा आरोप केला.
कुटुंबीयांनी फिर्यादीत म्हटलं आहे की, गावातील युवक विनय यादव अनेक दिवसांपासून त्यांच्या मुलीला त्रास देत होता. मुलीचे लग्न ठरल्याने तो संतापला. लग्नानंतर तो मुलीला स्वतःसोबत घेऊन गेला. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनय यादव या तरुणाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
पोलिसांनी लवकरच विनय यादव आणि तरुणीला अटक केली.मुलीने कोर्टात जबानी दिल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. मुलीने कोर्टात सांगितलं, की ती प्रौढ आहे आणि तिच्या इच्छेने तरुणासोबत गेली होती. तिला फक्त विनय यादवसोबत राहायचं आहे. मुलीच्या जबाबाच्या आधारे न्यायालयाने दोघांची सुटका केली. सहजनवा पोलीस ठाण्याचे प्रभारी मदन मोहन मिश्रा म्हणाले, ‘मुलगा आणि मुलगी दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं . कोर्टात मुलीने विनय यादवसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.