सूरजपूर : (छत्तीसगड):- एका व्यक्तीची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवल्याप्रकरणी सूरजपूर पोलिसांनी एक महिला, तिचा भाऊ आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलींना अटक केली आहे.आरोपीने सांगितले की, हा व्यक्ती अनेकदा अल्पवयीन मुलींचा विनयभंग करत असे आणि 1 मेच्या रात्री त्या एका मुलीला रिकाम्या घराकडे ओढत नेत होता, त्यावेळी ‘स्वसंरक्षणासाठी’ त्याची हत्या केली.हा व्यक्ती प्रतापपूर परिसरात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर मृतदेह पाहून खून झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि शवविच्छेदन अहवालात गळा दाबून आणि मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आरोपी महिलेने खून केल्याची कबुली दिली आहे. भाऊ आणि मुलीसह हे पाऊल उचलल्याचेही तिने सांगितले. संजय असे मृताचे नाव असून तो गेल्या पाच वर्षांपासून तेथे राहत होता. तो मजुरीचे काम करायचा आणि नेहमी दारूच्या नशेत असायचा. ही घटना १ मे रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुलगी घाबरून असे पाऊल उचलू शकते का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
1 मे रोजी रात्री सर्वजण झोपलेले असताना अल्पवयीन मुलीच्या ओरडण्याने त्यांना जाग आली आणि त्यांनी आरडाओरडा करून त्या दिशेने धाव घेतली.बाहेर जाऊन पाहिले असता संजयने मुलीला ओढत आपल्या घराकडे नेले. त्याच्या या कृत्यामुळे संतापलेल्या महिलेसह इतर लोकांनी मिळून संजयला मारहाण करून दोरीने त्याचा गळा आवळून खून केला. आणि नंतर आत्महत्या केल्यासारखे वाटावे यासाठी झाडाला लटकवले. महिला आणि तिच्या भावाला अटक करण्यात आली, तर अल्पवयीन मुलांना बालगृहात पाठवण्यात आले आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधीक्षक एम.आर.अहिरे यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पुरावे गोळा करण्याच्या सूचना दिल्या.पंचनामा केल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाने मृतदेहाचे शवविच्छेदन केले. पोलिसांनी कुटुंबीय आणि ग्रामस्थांची चौकशी केली. मृताचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने, अहवाल प्राप्त झाला ज्यामध्ये डॉक्टरांनी मृताचा मृत्यू खून असल्याचे घोषित केल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हे पण वाचा
- Viral Video: ‘पापा की परी’ रीलच्या नादात धबधब्या जवळ जातांना अचानक……जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका पहा व्हिडिओ.
- महिन्याभरापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…..
- भुसावळ येथील गोडाऊन मधून 35 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु चोरीच्या गुन्हा उघडकीस; शिरपूर येथून मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात.
- भूसंपादनाचा वाढीव मोबदला न दिल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची पारोळ्याच्या शेतकऱ्यांनी केली जप्ती.
- ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी झालेल्या विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला विष दिलं, मग स्वतःनेही संपविले जीवन.