Viral video:एक तरुण गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी टेरेसवर गेला,अचानक समोरून आले तिचे बाबा पुढे काय भलतंच घडलं; पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral video: एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेली अनेक जोडपी तुम्ही पाहिली असतील. अशी अनेक जोडपी असतात ज्यांना घरातून नात्यासाठी परवानगी नसते. अशावेळी जगाची पर्वा न करता ही जोडपी गुपचूप एकमेकांना भेटतात.मांजर दुध पिताना डोळे बंद करून पिते म्हणून तिला वाटते की मला कोणीही पाहत नाही” मात्र तिला सगळे पाहत असतात. असंच काहीसं या प्रेमात पडलेल्या तरुणाईचं असतं. घरच्यांचा डोळा चुकवून ते एकमेकांना भेटतात खरे पण कधीतरी ते सापडतातच. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. एक तरुण गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी टेरेसवर पोहोचतो मात्र समोर गर्लफ्रेंडचे बाबा येतात. आता तुम्हीच विचार करा या तरुणाचं काय झालं असेल. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय झालं?

तर त्याचं झालं असं की, एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिच्या घरच्या टेरेसवर पोहचला होता. यावेळी अचानक तिथे तरुणीचे काका आणि बाबा आल्याचं व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे गर्लफ्रेंडला भेटायला आलेल्या बॉयफ्रेंडची चांगलीच फजिती झाली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण टेरेसवरुन अक्षरश: उड्या मारून खाली उतरत आहे. यावेळी त्याचा जरा जरी तोल गेला असता तर मोठा अपघात झाला असता. तसेच यामध्ये तरुण जखमी होण्याचीही शक्यता आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धरालं.यासगळ्यात कसाबसा बॉयफ्रेंड पळ काढतो. पण नंतर तरुणी मात्र एकटीच या सगळ्यात अडकते.

हा व्हिडीओ @stunt_man_indori_ नावाच्या ट्वीटर हँडलवरुन सोशल मीडियावर अपलोड केला गेला आहे. त्यानंतर या व्हिडीओने एकच गोंधळ उडवून दिला आहे. या व्हिडीओला लाखोवेळा पाहिलं गेलं आहे, तर अनेकांनी यावर भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक तरुणाची मस्करी करत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘काय गरज होती’ असंच केलं पाहिजे.’काही महिन्यांपूर्वीही अशीच घटना समोर आली होती. यामध्ये, राजस्थानमध्ये एका तरुणीनं घरात कुणी नसल्याचा फायदा घेत बॉयफ्रेंडला घरी बोलावलं मात्र तिचा असा पचका झाला की तिला बॉयफ्रेंडला चक्क कुलरमध्ये लपवावं लागलं. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

https://www.instagram.com/reel/C6EFiClvS9T/?igsh=MWcxdGd1aHhyZHd1OQ==

हे पण वाचा

टीम झुंजार