शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. केदारनाथ धामचे दरवाजे आजपासून म्हणजे 10 मे पासून खुलं होणार आहेत. दर्शनाची आस लावून बसलेल्या लाखो श्रद्धाळूंसाठी आणि पर्यटकांसाठीही हा महत्त्वाचा क्षण असेल.केदारनाथचे कपाट खुलण्याची सर्वतोपरी तयारी सुरु आहे. मंदिर परिसरात फुलांची सजावट करण्यात आली आहे. प्रशासनाकडून चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
चलो बाबा केदारनाथ…
सोमवारी ओंकारेश्वर मंदिरात केदारपुरीचे रक्षक बाबा भैरवनाथ यांच्या पूजेने केदारनाथचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली. बाबा केदार यांची पंचमुखी चाल-विग्रह उत्सव डोली सोमवारी विशेष पूजन करून निज धामकडे प्रस्थान झाली आहे. यासाठी ओंकारेश्वर मंदिराला आठ क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं होतं. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. आता 9 मे रोजी ही डोली केदारनाथ धाममध्ये दाखल होईल.
केदारनाथ मंदिर या दिवशी सुरु होणार
बाबा केदारनाथ धामचे दरवाजे 10 मे रोजी सकाळी 7 वाजेपाासून उघडण्यात येतील. देशविदेशातून भाविक यासाठी दाखल होत आहेत. बाबा केदारनाथ मंदिर बद्रीनाथ-केदारनाथ धाम समितीकडून दर्शनासाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत.
10 मे ते 3 नोव्हेंबरपर्यंत केदारनाथ मंदिर खुलं
केदारनाथ धाम मंदिराचे कपाट खुलण्याची प्रक्रिया 10 मे रोजी पहाटे सुरु होईल. 6.20 मिनिटांनी मंत्रोच्चारामध्ये या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल, त्यानंतर केदारनाथ धाम भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं जाईल. 10 मे 2024 पासून 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत केदारनाथ मंदिर दर्शनासाठी खुलं असेल.
कपाट खुलताना हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चार धामचे कपाट खुलण्यासंदर्भात माहिती दिली आहे. पुष्कर सिंह धामी म्हणाले की, ज्या दिवशी चार धामांचे दरवाजे उघडतील, त्या दिवशी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाईल. भाविकांची चार धाम यात्रा अधिक चांगली करण्याची सरकारची जबाबदारी आहे.
10 मेपर्यंत सर्व तयारी पूर्ण होईल
चारधाम यात्रा सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी 10 मे पर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. येथे येणाऱ्या भाविकांची योग्य सोय केली जाईल.
बद्रीनाथ-केदारनाथ धाम समितीकडून लागू करण्यात आलेले नियम
मंदिर समितीकडून भाविकांसाठी कडक ड्रेसकोड लागू नाही. मात्र, मर्यादित कपडे घालण्याचं आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आलं आहे.केदारनाथ धाम मंदिर परिसरात मोबाईल वापरण्यावर निर्बंध आहेत.मंदिर परिसरात फोटो काढण्यास, रिल बनवण्यास किंवा कोणताही व्हिडीओ शूट करण्यास मनाई आहे. गेल्या वर्षी काही आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे
केदारनाथ मंदिरामध्ये मोबाईल बंदी
केदारनाथ मंदिर समितीने मंदिर परिसरात फोन नेण्यावर बंदी घातली आहे. एवढंच नाही तर भाविकांना आता मंदिरात फोटो, रिल्स किंवा व्हिडीओही काढता येणार नाहीत. यासोबतच मंदिर समितीने कपडे घालण्याबाबत नवीन नियम लागू केले आहेत. काही दिवसांपूर्वा केदारनाथ मंदिर परिसरातील काही व्हिडीओ व्हायरल झाले होते, या व्हायरल व्हिडीओमुळे पावित्र्य भंग करत भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने आता मोबाईल फोनला मनाई केली आहे.
फोटो आणि रिल्स बनवणाऱ्यास मनाई
केदारनाथ हे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे. आयुष्यात किमान एकदा तरी येथे जाण्याची अनेकांची इच्छा असते. पवित्र केदारनाथ धाम चारधामपैकी एक महत्त्वाचं स्थान आहे. पण, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी केदारनाथ व्ह्युज आणि लाईक्स मिळवण्याचं एक माध्यम बनलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियावर केदारनाथचे व्हिडीओ, रिल्स आणि फोटो प्रचंड व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हे पण वाचा
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले