Viral Video : पेट्रोल पंपावरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी पेट्रोल पंपावर पेट्रोलचोरी, तर कधी आगीच्या घटना घडत असतात. अशातच पेट्रोल पंपावरील एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यामध्ये एक तरुणी पंपावरील कर्मचाऱ्यासमोर अतिशय लज्जास्पद कृत्य करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तरुणीच्या त्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दोन तरुणी स्कुटीवरून पेट्रोल पंपावर पोहोचल्या.
त्यानंतर या तरुणी स्कुटीवर बसून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांशी बोलत होत्या. बोलता बोलता एक तरुणी स्कुटीवरून अचानक खाली उतरली आणि कपडे काढू लागली. ती तरुणी स्कुटीवरून उतरली आणि तिथे उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यासमोर आपली पँट खाली केली. त्यानंतर काहीतरी बोलत तिने पुन्हा पँट वर केली. घटनेदरम्यान कर्मचारी समोरच्या दिशेने हात करीत काहीतरी सांगत असल्याचे दिसतेय. पण या तरुणीने असे लज्जास्पद कृत्य का केले आणि हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्या तरुणीवर संताप व्यक्त केला आहे.
एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, ही मुलगी एका सामान्य व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत होती. त्यावर दुसऱ्या युजरने लिहिले की, या मुलींना कशाची भीती का वाटत नाही? तिसऱ्या युजरने लिहिले की, त्यांना लाज वाटत नाही का? पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत हे त्यांना माहीत नव्हते का? चौथ्या युजरने लिहिले की, या मुलींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हायला नको का? दरम्यान, आणखी एका युजरने लिहिले की, देशात अशा घटना कधी थांबणार? कोणी अश्लील रील बनवत आहे; तर कोणी खुलेआम कपडे बदलत आहे. आता तर ही तरुणी पेट्रोल पंपावर कपडे काढताना दिसली.
हे पण वाचा
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.