माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश.महाविकास आघाडीला धक्का.

Spread the love

एरंडोल :- एरंडोल मतदारसंघाचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष महेंद्रसिंह पाटील यांनी आज असंख्य समर्थकांसह जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर
महाराज जळकेकर,माजी खासदार ए.टी.नाना पाटील, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा देवयानी ठाकरे,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये
प्रवेश केला.माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांच्या भाजपमधील प्रवेशामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानास केवळ दोन दिवस शिल्लक असतांना महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीचे रखडलेले काम,पद्मालय प्रकल्प क्रमांक दोनच्या कामासह मतदारसंघातील अपूर्णावस्थेत असलेले प्रकल्पांना गती देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्याचे माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी सांगितले.हिमालय मंगल कार्यालयात आज भाजप आणि माजी आमदार महेंद्रसिंह पाटील समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.मेळाव्यात माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली.

अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीनुसार काम पूर्ण झाले असून वाढीव उंचीत बुडीत होणा-या गावांचे पुनर्वसन न झाल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा करण्यात येणारी अडचण,तसेच पद्मालय क्रमांक दोनचे रखडलेले
काम या विषयावर शेतक-यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी कासोदा, आडगाव येथे सभा घेतल्या होत्या.चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण,भाजपच्या पदाधिकारी तथा
महेंद्रसिंह पाटील यांच्या भगिनी देवयानी ठाकरे यांचेसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनची भेट घेवून भाजपमध्ये प्रवेश करण्याची विनंती केली होती.

आमदार मंगेश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस,ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचेसाही संपर्क साधून माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांचेशी चर्चा घडवून आणली. लोकसभा निवडणुकीनंतर मुबई येथे बैठकीचे आयोजित करून एरंडोल मतदार संघातील अंजनी प्रकल्प,पद्मालय प्रकल्प दोन,यासह रखडलेल्या प्रकल्पांच्या कामांना गती देवून मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांना देवून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा असे आवाहन केल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी १९७७ आणि १९९५ असे दोन वेळेस मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले असून पंचायत समितीचे सभापती, धरणगाव बाजार समितीचे अध्यक्ष,शेतकी संघाचे अध्यक्ष,जिल्हा बँकेचे संचालक,जिल्हा परिषद सदस्य यासह विविध संस्थांवर नेतृत्व केले आहे.माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांच्या प्रवेशामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.मेळाव्यास पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार