वैशाली : सध्या प्रेमीयुगूलांच्या अनेक कहाण्या समोर येत असतात. अनैतिक संबंधांच्याही कहाण्या समोर येत असतात. असे असताना यातच आता आणखी एक धक्कादायक कहाणी समोर आली आहे. प्रेयसीला गुपचूप भेटणे दोन मुलांच्या वडिलांना चांगलेच महागात पडले आहे.प्रेयसीला भेटायला आलेल्या व्यक्तीला पकडून लोकांनी त्याचे लग्न प्रेयसीसोबत लावून दिले. ही घटना बिहारच्या वैशाली याठिकाणी घडली.
सदापुर महुआ गावात दुपारच्या सुमारास लीची गाछीजवळ दोन मुलांचा बाप आपल्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी आला होता. तसेच लपून आक्षेपार्ह अशा अवस्थेत होता.याची माहिती लोकांना मिळताच त्यांनी 112 नंबरवर कॉल करुन याबाबतची माहिती पोलिसांना दिली आणि आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर प्रियकर आणि प्रेयसीचे मदरशात लग्न लावून देण्यात आले. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
पोलीस ठाण्याचे प्रमुख सुभाष प्रसाद यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. यानंतर लिखित अर्ज द्यायला सांगितला. तोपर्यंत दोन्ही पक्षाच्या लोकांनी प्रियकर आणि प्रेयसीला महुआ मुकुंदपुर येथील मदरशात आणले.
प्रियकर प्रेयसीचे मदरशात लग्न –
याठिकाणी मुस्लीम परंपरेनुसार दोघांचे लग्न लावून देण्यात आले. लग्नानंतर प्रेमी मो. सलीम याने सांगितले की, हे लग्न आमच्या दोघांच्या संमतीने झाले आहे. यावेळी याठिकाणी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. तसेच प्रेम प्रसंगात पकड्यात आलेल्या दोन मुलांच्या बापाचे एका अविवाहित तरुणीसोबत लग्न झाल्यानंतर या घटनेची परिसरात जोरदार चर्चा आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






