पतीकडून सातत्याने होत असलेल्या त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल संपविले जीवन पतीस अटक.

Spread the love

पुणे : पतीकडून सातत्याने होत असलेल्या त्रासाला कंटाळून पत्नीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरची घटना पुण्याच्या येरवड्यातील नागपूरचाळ येथे घडली आहे. या प्रकरणातील आरोपी पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.येरवड्याच्या नागपूरचाळ येथील मोनिका मधुकर ओव्हाळ (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मोनिका ओव्हाळ या पती मधुकर लक्ष्मण ओव्हाळ (वय ४०) वास्तव्यास होत्या.

दरम्यान पती मधुकर ओव्हाळ यांच्याकडून त्रास दिला जात असल्याने मोनिका यांनी मंगळवार पहाटे साडेपाचच्या सुमारास घरातच गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती मधुकर याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

१० मे पर्यंत पोलीस कोठडी

दरम्यान या प्रकरणातील आरोपी पती मधुकर लक्ष्मण ओव्हाळ याच्याविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तसेच आरोपी पतीला १० मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत

हे पण वाचा

टीम झुंजार