नाशिक :- नातवाला ताब्यात ठेवायचे असेल, तर सासू-सासऱ्यांकडे गाडी व फ्लॅट नावावर करण्यासह दहा कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या सुनेसह तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी साहेबराव हिंमतराव पाटील (वय 65, रा. कर्मयोगीनगर, आर. डी. सर्कल, नाशिक) हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत. पाटील यांची आरोपी सून स्नेहा रोशन पाटील व तिचा प्रियकर अजिंक्य पाटील (दोघेही रा. करावे, नेरूळ, नवी मुंबई) यांनी संगनमत करून कटकारस्थान रचले.
त्यानंतर फिर्यादी पाटील व त्यांच्या कुटुंबीयांचे मानसिक खच्चीकरण व्हावे, तसेच समाजात बदनामी करून प्रतिमा मलिन केली; मात्र पाटील कुटुंबीयांनी सून स्नेहा व अजिंक्य पाटील यांच्या अनैतिक संबंधांवर पांघरुण घातले; परंतु सुनेने दुष्ट व अप्रामाणिक हेतू डोळ्यासमोर ठेवून पाटील कुटुंबीयांचे आर्थिक नुकसान करण्याच्या इराद्याने व स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी स्नेहा पाटील हिने फिर्यादी साहेबराव पाटील, पत्नी शोभा, तसेच मुलगा रोशन यांना वेळोवेळी धमक्या देऊन, भीती घातली, तसेच फिर्यादीपाटील यांच्या पत्नीला धक्काबुक्की करून शिवीगाळ व दमदाटी केली.
एवढेच नव्हे, तर फिर्यादी पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना नातू सम्राटला भेटण्यासाठी, त्याला ताब्यात ठेवण्यासाठी आरोपी स्नेहा पाटील हिने फिर्यादी साहेबराव पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांकडे नवी मुंबईमध्ये जॅगवॉर गाडी, फ्लॅट्स नावावर करून देण्यासह दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली. हा प्रकार ऑगस्ट 2016 ते दि. 7 मे 2024 या कालावधीत घडला. सून स्नेहा व तिचा प्रियकर अजिंक्य पाटील यांच्याकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर साहेबराव पाटील यांनी अंबड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.