धक्कादायक! २४ वर्षीय तरूण व १६ वर्षीय मुलीने सप्तश्रृंगी गडावर ४०० फूट खोल दरीत उडी मारून संपवले जीवन.

Spread the love

नाशिक :- सप्तश्रृंगी गडावर शीतकड्यावरून उडी मारून प्रेमी युगुलाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सप्तश्रृंगी गडावर असलेल्या शीतकड्यावरून प्रेमीयुगुलाने ४०० फूट खोल दरीत उडी घेतली. सात दिवसांपासून दोघेही बेपत्ता होते. कड्याच्या खाली एका झाडावर मुलीचा मृतदेह अडकला होता तर तरुणाचा मृतदेह खाली पायथ्याला पडला होता. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगेश राजाराम शिंदे आणि प्रियांका संतोष तिडके अशी आत्महत्या केलेल्या तरुण तरुणीची नावे आहेत.

तरुण २४ वर्षे वयाचा तर तरुणी १६ वर्षांची होती. मंगशे आणि प्रियांका दुचाकीवरून २८ एप्रिलला सप्तश्रृंगी गडावर आले होते. दोघांनी सप्तश्रृंगी गडावर शीतकडा इथून उडी मारून आत्महत्या केली. बेपत्ता झाल्यानंतर आठवड्याभराने प्रेमीयुगुलाचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. गडाच्या पायथ्याला असणाऱ्या भातोडे इथल्या गुराख्यांनी याची माहिती पोलीस पाटील विजय चव्हाण यांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मृतदेह दरीतून बाहेर काढले. मृतदेह कुजले असल्यानं जागीच शवविच्छेदन करण्यात आले.मंगेश आणि प्रियांका यांचे एकमेकांवर प्रेम होते अशी माहिती समोर आलीय. ते २८ एप्रिलपासून बेपत्ता होते. याबाबत कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिलीय की नाही याची माहिती समजू शकलेली नाही. दरम्यान, दोघांचे मृतदेह आढळल्यानंतर त्यांच्याजवळ असलेल्या साहित्यावरून त्यांची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास केला जात आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार