प्लॉट विक्रीस नकार दिल्याने मुलाने केला मातृदीनी आईचा खून. मुलगा व सून अटकेत. एरंडोल येथील घटना.

Spread the love

एरंडोल :- घराजवळ असलेला प्लॉट विक्रीस नकार दिल्याने मुलगा व सुनेने आईस मारहाण तिला जीवे ठार मारल्याची घटना पहाटे तीन वाजेच्या सुमारास
केवडीपुरा परिसरातील वनिता वसतीगृहा समोर घडली.पोलिसांनी संशयित मुलगा व सुनेस अटक केली आहे.आज जातीक मातृदिनाच्या दिवशीच मुलाने आईचा खून केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत माहिती अशी,की शहरातील केवडीपुरा भागातील वनिता वसतीगृहासमोर विमलबाई रोहिदास मोहिते (बेलदार) (वय ६०) ह्या पती रोहिदास मोहिते, मुलगा बापू मोहिते व सून शिवराबाई मोहिते यांचेसह राहतात.

त्यांच्या घराजवळ विमलबाई मोहिते यांचा प्लॉट असल्यामुळे त्यांचा मुलगा बापू मोहिते व सून शिवराबाई मोहिते हे दोघे जन प्लॉटची विक्री करावी असे विमलबाई यांना वारंवार सांगत होते.विमलबाई मोहिते ह्या प्लॉटची विक्री करण्यास नकार देत असल्यामुळे मुलागा बापू व सून हिवराबाई हे दोघे जन त्यांना शिवीगाळ करून
मारहाण करीत असे.मुलगा व सुनेकडून होणा-या त्रासाला कंटाळून विमलबाई ह्या काही दिवस नातेवाईकांकडे राहण्यास गेल्या होत्या.तसेच मुसळी येथील समाजबांधवांच्या घरी काही दिवस थांबल्या होत्या.

त्यानंतर समाजातील प्रतिष्टीत व्यक्तींनी मुलगा बापू व सून हिवराबाई यांना समजावले होते.त्यानंतर विमलबाई मोहिते ह्या एरंडोल येथे राहण्यासाठी आल्या होत्या.आज पहाटे विमलबाई मोहिते यांच्या बहिणीचा मुलगा संजय मोहिते यांना त्यांचा मामेभाऊ राजू बेलदार यांनी मोबाईलवरून मावशी मयत झाली असल्याचे कळवले. मावशी मयत झाल्याचे कळताच विमलबाई मोहिते यांची बहिण चिलाबाई मोहिते,भाऊ संजय मोहिते, विक्की मोहिते एरंडोल येथे आले.विमलबाई मोहिते यांचा मृतदेह पाहून सर्वांनी हंबरडा फोडला. त्यावेळी विमलबाई यांच्या हनुवटीजवळ जखम दिसून आली तसेच त्यांच्या उजव्या कानातून रक्त वाहत
होते.

सर्वांनी मुलगा बापू बेलदार याचेकडे चौकशी केली आता तो उडवाउडवीचे उत्तर देऊ लागल्यामुळे त्यांचा संशय बळावला.याबाबत वसंत उमराव मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलगा बापू मोहिते व सून हिवराबाई मोहिते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी मुलगा बापू व सून हिवराबाई यांना अटक केली असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत.आज मातृदिनाच्या दिवशी मुलाने केवळ प्लॉटची
विक्री करीत नाही या कारणावरून आईस मारहाण करून दगडावर आपटून जीवे ठार मारल्याची घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ केली जात असून मुलगा व सुनेच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार