अकोला :- पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील विवाहित महिलेच्या घरात घुसून दार बंद करून आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांनी विनयभंग करून शरीर सुखाची मागणी केल्याची घटना २३ एप्रिल रोजी उघडकीस आली. पोलीस कर्मचारी २३ एप्रिलच्या दुपारी विवाहितेच्या घरात घुसला आणि दार बंद केल. व विनयभंग करून शरीर सुखाची मागणी केली. महिलेने आरडाओरडा केल्याने आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांनी घरातून पळ काढला.
सदर घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास एन्काऊंटर करून जीवे मारण्याची धमकी दिली. आणि भ्रमणध्वनीवरून वारंवार फोन करून मानसिक त्रास दिल्या बाबतचे पोलीस कर्मचाऱ्यांचे बोलणे पीडित महिलेने रेकॉर्ड केले आहे. असा आरोप विवाहितेने जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे ६ मे रोजी दिलेल्या तक्रारीतून केला आहे. सदर तक्रारीवर चान्नी पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांच्या विरुध्द ११ मे रोजी विनयभंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्याप्रकरणी
जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांनी आरोपी पोलीस कर्मचारी बाळकृष्ण येवले यांना ११ मे रोजीच्या संध्याकाळी निलंबित केल्याचे आदेश पारित केले आहे. त्यामुळे पोलीस विभागात एकच खडबड उडाली आहे. याप्रकरणी बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज यांनी चान्नी ठाण्यात भेट देऊन पीडित महिलेची विचारपूस केली आहे.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.