Viral Video: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून डान्सचे व्हिडीओ तर काही विचारू नका. असे व्हिडीओ तर तूफान व्हायरल होतात.बॉलिवूडच्या गाण्यावर ताल धरणारी तरूणाई नेटकऱ्यांना वेड लावते, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सध्या अशाच एका तरूणीचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. यावेळी तिनं ”चोली के पिछे क्या हैं?” या गाण्यावर तूफान डान्स केला आहे. सध्या इंटरनेटवर हा व्हिडीओ अतिप्रचंड वेगाने व्हायरल झालाय.
हल्ली लहान मुलं आणि हायस्कूलमधील मुलंमुली ही शाळेच्या किंवा कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये डान्स करताना दिसतात. पालक त्यांचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल करताना दिसतात. त्यातून सध्या अशाच एका व्हिडीओची चर्चा आहे.29 मार्च 2024 रोजी ‘क्रु’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे या चित्रपटाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. काही वर्षांपूर्वी नीना गुप्ता आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित झालेले ‘चोली के पीछे क्या हैं?’ हे गाणं प्रचंड गाजले होते. ‘खलनायक’ या चित्रपटातील हे गाणं होते.
लोकप्रिय गायिका अलका याग्निक आणि ईला अरूण यांनी गायले आहे. सध्या हे गाणं बऱ्याच वर्षांनी करीना कपूर, क्रिती सनन आणि तब्बू यांच्या ‘क्रु’ या चित्रपटात रिक्रिएट केले आहे. ज्यावर करीना कपूरनं डान्स केला आहे. सध्या हे गाणं सर्वत्र ट्रेण्डिंग आहे. त्यामुळे गाण्याचीही बरीच चर्चा आहे. सध्या एका तरूण मुलीनं आपल्या कॉलेज फेस्टिवल मध्ये या गाण्यावर जोरदार डान्स केला आहे. यावेळी तिनं व्हाईट क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. त्यात तिचे डान्स मूव्ह्स पाहून अनेकांनी या डान्सवर टीकाही केली आहे.
त्यामुळे याची बरीच चर्चाही रंगलेली आहे. अनेकांनी हा डान्स अश्लील असल्याचेही म्हटले आहे, तर काहींनी हल्लीच्या विद्यार्थ्यांना नैतिकताही शिकवली जात नाही अशी टिकाही केली आहे. तर काहींनी या डान्समध्ये काहीच गैर नाही असं म्हणत या मुलीची बाजूही घेतली आहे. त्यामुळे सध्या या व्हिडीओखाली संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.मध्यंतरी असे अनेक व्हिडीओ हे व्हायरल झाले होते. ज्यावरून नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यातून हल्ली डान्सच्या नावाखाली काहीही अश्लील चाळे केले जातात, अशीही टीका नेटकरी करताना दिसतात. @divya_gandotra नावाच्या X युझर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
हे पण वाचा
- 26 वर्षीय महिला शिक्षिकेने लग्नास नकार दिल्याने, हताश झालेल्या 30 वर्षीय युवकाने शाळेच्या आवारातच महिला शिक्षिकेची केली हत्या!
- दुर्दैवी घटना! पोलीस सर्व्हिसचे प्रशिक्षण पूर्ण करुन पहिल्याच पोस्टिंगसाठी जाताना गाडीचे टायर फुटल्याने IPS अधिकाऱ्याच्या मृत्यू.
- सावदा येथे सराफ दुकानास आग; आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज.
- हजारो भाविकांच्या उपस्थितीत नथ्थू बापुंना चढवली भगवी चादर; पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम.
- धक्कादायक! गेल्या चार वर्षांपासून पोलीस चौकीत हवालदार म्हणून तैनात, सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह, वसुली सुरू, अन् एके दिवशी असा झाला पर्दाफाश.