सावदाः- ट्रॅक्टरला रोटाव्हीटर जोडत असतांना ट्रॅक्टर अंगावरुन गेल्याने यशवंत हेमचंद्र धांडे (वय ५७, रा. चिनावल) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना दि. १२ मे रोजी चिनावल येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. रावेर तालुक्यातील चिनावल गावातील यशवंत धांडे हे शेतकरी असून ते शेतात आंतरमशागतीसाठी ट्रॅक्टरला रोटाव्हिटरची जोडणी करीत होते.
यावेळी धांडे यांच्या अंगावरुन ट्रॅक्टर गेल्याने ते यामध्ये गंभीर जखमी झाले. ही घटना शेतातील इतरांच्या लक्षात येताच त्यांना तात्काळ गावातील रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे चिनावल व परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.