नवी मुंबई :- दहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या 27 वर्षीय पूनम क्षीरसागर नावाच्या तरुणीचा मृतदेह अखेर एका सुटकेसमध्ये आढळून आला. मानखुर्दमधील साठेनगरमध्ये राहणाऱ्या पूनमची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमधून टाकला होता. तिची हत्या लव्ह जिहाद असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दुसरीकडे पूनम क्षीरसागर या महिलेच्या हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी टॅक्सी चालक निजामुद्दीनला शेखला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, 25 एप्रिल रोजी सकाळी पूनम क्षीरसागर या 27 वर्षीय महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत चिरनेर उरण, जंगलात येथे रस्त्याच्या कडेला ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला होता. उरण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 302 (हत्या) आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक निजामुद्दीन अली शेख याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस तपासात मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 18 एप्रिल रोजी एक महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. अधिकाऱ्याने सांगितले की, तपासादरम्यान उरणमधील रस्त्यावर सापडलेला मृतदेह बेपत्ता महिलेचा असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. मृत महिला पुनम क्षीरसागर हीचे आणि आरोपी निजामुद्दीन अली शेख सोबत चार वर्ष प्रेम सबंध होते. आरोपी निजामुद्दीन याचे आधीच लग्न झाले होतं आणि त्याला मुलगाही होता त्याचे कुटुंब उत्तर प्रदेश मध्ये राहत होते, तर तो मुंबईतील नागपाडा परिसरात राहत होता.
मृत महिला आणि त्यांच्याच याच कारणावरून काही दिवसांपासून खटके उडाले आणि त्यांतून त्याने तिचा ठार मारल्याच्या आपल्या कबुली जबाबात सांगितले. पुढील तपास उरण पोलीस करत आहेत.तर दुसरीकडे अलीने पोलिसांकडे असा खुलासा केला की, पूनम धोका देत असल्याचा संशय होता आणि यावरून दोघांमध्ये वादही होत होता. 18 एप्रिलला कामानंतर तिला जेजे हॉस्पिटलजवळ यायला सांगितलं होतं. तिथून कल्याणमध्ये खडावली नदी किनारी तिची गळा आवळून हत्या केली. पूनमचा मृतदेह एका पोत्यात घालून उरणच्या चिरनेर इथं फेकून दिला. टॅक्सी ड्रायव्हर असल्यानं त्या ठिकाणाबद्दल आपल्याला माहिती होती असंही अलीने सांगितलं.
हे पण वाचा
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.