जयपूर : अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंधातून गंभीर गुन्हे घडण्याचं प्रमाण वाढलं आहे. राजस्थानमध्ये याच कारणावरून गंभीर गुन्हा घडला. पत्नीच्या अनैतिक संबंधांना विरोध करणं पतीच्या जिवावर बेतलं. पत्नीने प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली. हत्येनंतर तिने मृतदेहाची विल्हेवाट लावली आणि निवांतपणे प्रियकरासोबत झोपली. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढचा तपास सुरू आहे.पत्नीच्या अनैतिक संबंधांना विरोध करणं पतीला भलतंच महागात पडलं. पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची गळा दाबून हत्या केली.
त्यानंतर पतीचा मृतदेह घरातल्या 15 फूट खोल सिवेज टँकमध्ये फेकून दिला आणि टँकचं झाकण लावून घेतलं. या टँकमधून घाण वास येऊ लागताच आसपासच्या भाडेकरूंनी टँकचं झाकण उघडलं. तेव्हा त्यात मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. ही घटना राजस्थानमधल्या जयपूरच्या करधनी परिसरात घडली. 7 मे रोजी संध्याकाळी सरना डुंगरमध्ये जान मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीचा मृतदेह त्याच्या घरातली सीवरेज टँक अर्थात मलनिःस्सारण टाकीत सापडला. त्यानंतर करधनी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात पोहोचवला.
दुसरीकडे, मृत व्यक्तीची पत्नी शाहजहाँ खातूनने पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात हत्येप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, शाहजहाँनं सांगितलं, की ‘माझे पती 2 मे रोजी नोकरीसाठी उदयपूरला चाललो सांगून घरातून निघाले. त्यानंतर त्यांचा कॉल लागला नाही.’ पत्नीच्या जबाबावर पोलिसांना संशय आला; मात्र त्यानंतर सत्य समोर आलं. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली शाहजहाँ खातून आणि तिचा प्रियकर धर्मेंद्रला अटक केली आहे. या महिलेला दोन मुलं आहेत. तरीदेखील तिचे उत्तर प्रदेशातल्या धर्मेंद्र पासवान नावाच्या व्यक्तीशी गेल्या वर्षापासून अनैतिक संबंध होते. गेल्या काही महिन्यांपासून ही महिला प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा कट रचत होती.पोलिस चौकशीदरम्यान, शाहजहाँ आणि मोहम्मद या दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याचं समोर आलं.
पोलिसांना वादाचं कारण समजताच त्यांनी शाहजहाँ खातूनची कठोरपणे चौकशी सुरू केली. तेव्हा तिने हत्येमागचं कारण सांगितलं आणि प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याचं कबूल केलं. जयपूर पश्चिमचे पोलिस उपायुक्त अमित कुमार यांनी सांगितलं, की `आरोपी महिला शाहजहाँ खातूनचे धर्मेंद्र पासवान या व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. या संबंधांची माहिती तिचा पती जान मोहम्मदला समजली तेव्हा त्याने त्यास विरोध केला. त्यानंतर पती-पत्नीत कायम वाद होत असत.`शाहजहाँ धर्मेंद्रशी विवाह करणार होती. यात पतीचा अडसर होता. 2 मे रोजी रात्री तिचा पती जान मोहम्मद घरी आला तेव्हा तो दारूच्या नशेत होता. त्याच्या पत्नीनं या गोष्टीचा फायदा घेऊन त्याचे हात-पाय ओढणीनं बांधले. त्यानंतर प्रियकराच्या मदतीने त्याचं तोंड उशीने दाबलं. त्यानंतर त्याची गळा दाबून हत्या केली. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन मृतदेहाची विल्हेवाट लावली. मृतदेह सीवरेज टँकमध्ये फेकून देऊन टँकचं झाकण लावून घेतलं. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
हे पण वाचा
- 26 वर्षीय महिला शिक्षिकेने लग्नास नकार दिल्याने, हताश झालेल्या 30 वर्षीय युवकाने शाळेच्या आवारातच महिला शिक्षिकेची केली हत्या!
- दुर्दैवी घटना! पोलीस सर्व्हिसचे प्रशिक्षण पूर्ण करुन पहिल्याच पोस्टिंगसाठी जाताना गाडीचे टायर फुटल्याने IPS अधिकाऱ्याच्या मृत्यू.
- सावदा येथे सराफ दुकानास आग; आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज.
- हजारो भाविकांच्या उपस्थितीत नथ्थू बापुंना चढवली भगवी चादर; पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम.
- धक्कादायक! गेल्या चार वर्षांपासून पोलीस चौकीत हवालदार म्हणून तैनात, सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह, वसुली सुरू, अन् एके दिवशी असा झाला पर्दाफाश.