Viral Video: प्रेमाला काळ,वेळ, वय, अंतर कशाचं बंधन नसलं तरी जागा व प्रसंगाचं भान हे असायलाच हवं. स्वतःचाच नव्हे तर इतरांचाही जीव धोक्यात घालून केलेलं प्रेम हे अक्षरशः घातक म्हटलं जाऊ शकतं.असाच घातक प्रकार छत्तीसगडच्या जशपूरमध्ये घडल्याचे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एका जोडप्याला धोकादायक रोमँटिक स्टंट करताना पकडले गेल्याचे दिसतेय. हे जोडपं केटीएम बाईकने प्रवास करताना अश्लील चाळे करत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले होते. यातील तरुण हा गाडी चालवत असताना त्याची प्रेयसी पेट्रोलच्या टाकीवर बसली होती.
पोलिस अधीक्षकांनी (एसपी) त्यांना रंगेहात पकडल्यावर त्यांच्यावर कारवाई केली आहे.विनय असे या दुचाकीस्वाराचे नाव असून तो आपल्या गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी हायवेवर स्टंट करत होता. एसपी जशपूर शशी मोहन सिंग यांनी त्यांना त्यांच्या कारमधून पाहिले आणि धोकादायक स्टंट करत असलेल्या जोडप्याचा व्हिडीओ बनवला. शनिवारी (११ मे) दुपारी एसपी कुंकारी येथे जात असताना त्यांना हे जोडपे राष्ट्रीय महामार्ग (NH)-43 वर स्टंट करताना दिसले. एसपी यांनी त्यांचा पाठलाग केला आणि व्हिडीओ बनवला विशेष म्हणजे, यावेळी विनय हेल्मेट घालून दुचाकी चालवत होता व त्याची १८ वर्षीय मैत्रीण सुहानी दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर बसली होती.
जीवघेणा स्टंट करताना त्यांनी एसपीची गाडी पाहिली आणि पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, एसपीने त्यांचा पाठलाग करत मोबाईलवर या जोडप्याचा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला अनेकांनी बघितले आहे. एसपी शशी मोहन सिंग म्हणाले, ‘आम्ही या जोडप्याला कुंकुरी ते जशपूरला जाताना एक धोकादायक स्टंट करताना पाहिले, आम्ही त्यांना थांबवले आणि त्यांची चौकशी केली. त्यांनी आम्हाला सांगितले की ते मायली धरणाला भेट देण्यासाठी आले होते आणि स्टंट करत होते.
आम्ही त्यांच्यावर कारवाई केली आहे.’ प्राप्त माहितीनुसार या जोडप्याला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.दुसरीकडे, सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर सुद्धा लोक सडकून टीका करत आहेत. ‘वासनेच्या आहारी गेलेले हे लोक, यांना लाज सोडा पण निदान काळजी तरी वाटली पाहिजे. ‘अशा पद्धतीच्या कमेंट्स यावर दिसत आहेत. तर काहींना हा मुद्दा उपस्थित केलाय की, ‘एसपी यांनी पुरावा म्हणून व्हिडीओ शूट केला हे मान्य असलं तरी तो व्हायरल करून त्या जोडप्याची समाज माध्यमावर बदनामी करण्याची गरज होती का?’
हे पण वाचा
- 26 वर्षीय महिला शिक्षिकेने लग्नास नकार दिल्याने, हताश झालेल्या 30 वर्षीय युवकाने शाळेच्या आवारातच महिला शिक्षिकेची केली हत्या!
- दुर्दैवी घटना! पोलीस सर्व्हिसचे प्रशिक्षण पूर्ण करुन पहिल्याच पोस्टिंगसाठी जाताना गाडीचे टायर फुटल्याने IPS अधिकाऱ्याच्या मृत्यू.
- सावदा येथे सराफ दुकानास आग; आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज.
- हजारो भाविकांच्या उपस्थितीत नथ्थू बापुंना चढवली भगवी चादर; पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम.
- धक्कादायक! गेल्या चार वर्षांपासून पोलीस चौकीत हवालदार म्हणून तैनात, सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह, वसुली सुरू, अन् एके दिवशी असा झाला पर्दाफाश.