यावल :- तालुक्यातील कोळवद येथील एका शेतकऱ्याचे जळगाव जनता बँकेच्या यावल शाखेत खाते आहे. या खात्यात शुक्रवार अक्षय तृतीयेच्या रात्री ते शनिवारी सकाळी या वेळेपर्यंत तब्बल ४३ लाख २२ हजार रुपये जमा झाले. रात्रभर दर तीन मिनिटाला खात्यात पैसे येत असल्याने शेतकऱ्याची झोप उडाली होती. सकाळी बँकेची संपर्क साधला मात्र, सुट्टी होती दरम्यान मंगळवारी बँकेच्या निदर्शनास हा प्रकार शेतकऱ्यांनी आणून दिल्यानंतर बँकेकडे शेतकऱ्याने प्रामाणीक पणे सर्व रक्कम परत केली आहे.
तत्पूर्वी शेतकऱ्यांनी एक लाख रुपये विड्रॉल केले होते. टेकनिकल अडचण निर्माण झाल्याने हा प्रकार घडल्याचे बँक व्यवस्थापकांनी सांगीतले. कोळवद ता. यावल येथील शेतकरी किशोर नरसिंग पाटील यांचे जळगाव जनता बँकेच्या यावल शाखेत खाते आहे. त्यांच्या खात्यात शुक्रवार दिनांक १० मे अक्षय तृतीयेच्या रात्री १०.४७ मिनिटाला अचानक मोबाईल मध्ये एसएमएस आला आणि त्यांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा झाले. पैसे आले कुठून ?, हा विचार शेतकरी करत होते. तितक्यात पुढच्या तीन मिनिटाला पुन्हा दहा हजार आले आणि तेथून संपूर्ण रात्रभर शनिवार दिनांक ११ मे रोजी सकाळी १०.४७ पर्यंत सतत पैसे जमा होत गेले व त्यांच्या खात्यात तब्बल ४३ लाख २२ हजार रुपयाची रक्कम जमा झाली होती.
शेतकऱ्याच्या खात्यात यापूर्वी केवळ ७ हजार रुपये होते. शेतकरी पुरते हैराण झाले रात्रभर त्यांना झोप लागली नाही. की, खात्यात पैसे येताय तरी कुठून. त्यांनी दुसऱ्या दिवशी बँकेशी संपर्क साधला मात्र सुट्टी असल्याने तसेच रविवारी व सोमवारी देखील सुट्टी असल्याने बँक सुरू नव्हती. तेव्हा मंगळवारी दिनांक १४ मे रोजी शेतकरी किशोर पाटील हे जनता बँकेच्या शाखेत पोहोचले हा प्रकार व्यवस्थापक अरूण सोनवणे यांच्या निदर्शनास आणुन दिला व प्रामाणिक पणे सर्व रक्कत त्यांनी बँकेस परत केली. त्यांच्या खात्यात टेकनिल अडचण आल्याने ऑटो सिस्टीम व्दारे पैसे गेले असे बँकेच्या व्यवस्थापकांनी त्यांना सांगितले.
दर तीन मिनिटाला आले पैसे. आपण सामान्य शेतकरी असून दर तीन मिनिटाला माझ्या खात्यात पैसे येत आहे. म्हणून मी अक्षय तृतीयेच्या रात्री झोपलो नाही इतकी मोठी रक्कम माझ्या खात्यात येते तरी कुठून आहे असा प्रश्न पडला होता असे शेतकरी किशोर पाटील यांनी सांगितले. पडताळणी करीता काढले १ लाख. आपल्या खात्यात खरचं पैसे आली की कोणी मस्करीचे मेसेज टाकत आहे. असा प्रश्न शेतकऱ्याला पडला होता. म्हणून त्यांनी या खात्यातून एक लाख रुपये ऑनलाईन विड्रॉल केले. तेव्हा पैसे निघाल्याचे पाहून ते चक्रावले व खऱ्या अर्थाने आपल्या खात्यात ४३ लाख २२ हजार रुपये आहे हे स्पष्ट झाले तर मंगळवारी बँक सुरू झाल्यावर जेव्हा शेतकरी तिथे गेले तेव्हा त्यांच्या खात्यातील सर्व एन्ट्री डिलीट करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
शेतकऱ्याचे खाते मायनस मध्ये.शेतकरी पाटील यांच्या खात्यात केवळ ७ हजार रूपये होते मात्र, त्यांनी एक लाख रूपये काढल्याने आज रोजी शेतकरी पाटील यांचे खाते ९३ हजाराने मायनस मध्ये आहे. तांत्रीक अडचण.
तांत्रीक अडचणीमुळे ऑटो सिस्टमव्दारे शेतकऱ्याच्या खात्यात पैसे गेले शेतकऱ्याने प्रामाणीक पणे बँकेला मािहती दिली व ते पैसे परत केले सदर तांत्रीक अडचण कुठे व कशी निर्माण झाली याची वरिष्ठ पातळीवर समस्या सोडवण्यात आली आहे. असे जळगाव जनता बँक च्या यावल शाखेचे व्यवस्थापक अरुण सोनवणे यांनी सांगीतले.
हे पण वाचा
- 26 वर्षीय महिला शिक्षिकेने लग्नास नकार दिल्याने, हताश झालेल्या 30 वर्षीय युवकाने शाळेच्या आवारातच महिला शिक्षिकेची केली हत्या!
- दुर्दैवी घटना! पोलीस सर्व्हिसचे प्रशिक्षण पूर्ण करुन पहिल्याच पोस्टिंगसाठी जाताना गाडीचे टायर फुटल्याने IPS अधिकाऱ्याच्या मृत्यू.
- सावदा येथे सराफ दुकानास आग; आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज.
- हजारो भाविकांच्या उपस्थितीत नथ्थू बापुंना चढवली भगवी चादर; पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम.
- धक्कादायक! गेल्या चार वर्षांपासून पोलीस चौकीत हवालदार म्हणून तैनात, सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह, वसुली सुरू, अन् एके दिवशी असा झाला पर्दाफाश.