यावल :- शहरातील शिवाजीनगर भागात किल्ला परिसरातून एकाच कुटुंबातील 48 वर्षीय वृद्ध महिला, 26 वर्षीय महिला तसेच सात वर्षीय बालक आणि चार वर्षीय बालिका अशी चौघे बेपत्ता झाले आहे. हे चौघे घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेले आणि बेपत्ता झाले. त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही ते मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील चौघेजण बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ वळली आहे
यावल शहरात शिवाजी नगरात किल्ला परिसरात वस्ती आहे. या वस्तीतील रहिवाशी संगीता दिलीप सोनार वय 48 ही वृद्ध महिला, तिची विधवा मुलगी मीनाक्षी उर्फ पूजा मुकेश सोनार वय 26 वर्ष, गणेश मुकेश सोनार वय 7 वर्षे व पियू मुकेश सोनार वय 4 वर्ष हे चौघे दिनांक 9 मे रोजी आपल्या घरात कोणाला काही नाही सांगता बाहेर गेले आणि बेपत्ता झाले.
या चौघांचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला. मात्र, चौघे कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात गणेश दिलीप सोनार यांनी दिलेल्या खबरी वरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे एकाच कुटुंबातील चौघेजण बेपत्ता झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.या चौघांचा शोध आता यावल पोलीस घेत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






