बंगळुरू : कर्नाटकमध्ये एका ३२ वर्षांच्या तरुणाने दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलीची निर्घृण हत्या केलीय. धक्कादायक बाब म्हणजे निकालाच्या दुसऱ्याच दिवशी अल्पवयीन मुलीचं लग्न ३२ वर्षीय तरुणासोबत ठरवण्यात आलं होतं. त्यानेच तिची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. साखरपुड्यानंतर आरोपी तरुण तिच्या घरी आला आणि तिला घरातून ओढत नेलं. एका मंदिराजवळ तिचं शीर धडावेगळं करून तिची हत्या करण्यात आली.
या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास केला जात आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोडागु इथल्या युएस मीना नावाची मुलगी सुरलब्बी इथल्या हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होती. नुकताच दहावीचा निकाल लागला असून यात ती उत्तीर्णसुद्धा झाली आहे. दरम्यान, निकालानंतर तिचं लग्न तिच्या वयापेक्षा दुप्पट वय असणाऱ्या ओंकारप्पा नावाच्या तरुणासोबत ठरवण्यात आलं. त्यानेच तिची निर्घृण हत्या केली. हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
कोडागू जिल्ह्यातल्या दुर्गम अशा गावातली ती सरकारी शाळेत शिकणारी शिकणारी एकमेव एसएसएलसी विद्यार्थीनी होती. गुरुवारी तिचा साखरपुडाही करण्यात आला होता. त्यानंतर होणारा पती ओंकरप्पा सायंकाळी चार वाजता पुन्हा तिच्या घरी आला. तिला घराजवळच फिरायला घेऊन गेला. त्यानंतर एका मंदिराजवळ तिचं शीर धडावगळं केलं. तिच्या आई वडिलांसमोरच ही हत्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. युएस मीना ही सुब्रमणी आणि मुथक्की यांची एकुलती एक मुलगी होती.
हे पण वाचा
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.