पूर्णिया (बिहार) :- मधील तीन मुलांच्या बाप असलेल्या व्यक्तीचा मेहुणीवर जीव जडला आणि मेहुणीसोबत फरार झाला. संबंधित व्यक्तीच्या पत्नीने मदतीसाठी पोलिसांत धाव घेतली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.अजय शाह (वय ४०) लग्नाच्या 17 वर्षानंतर आपल्या मेहुणीसह पळून गेला असून, गेल्या 2 महिन्यांपासून घरी परतला नाही. तो पत्नीच्या व्हॉट्सॲपवर मेहुणीसोबतचे फोटोही पाठवतो. अजय शाह (पती) याचे त्याचा भाऊ अजित शाहच्या मेहुणीसोबत प्रेमसंबंध होते.
हा प्रकार 14 मार्च रोजी उघडकीस आला, जेव्हा तिने आपल्या पतीला मेहुणीसोबत खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. हे पाहून पत्नी निक्की देवीला धक्का बसला. बदनामी टाळण्यासाठी अजयने पत्नी निक्की देवी हिला रात्रभर खोलीत कोंडून ठेवले. दुसऱ्या दिवशी जेव्हा निक्की देवीला खोलीतून बाहेर आल्यानंतर तिने थेट जिल्ह्यातील महिला पोलिस ठाणे गाठले. तिथे तिने महिला पोलिस ठाण्याच्या एसएचओला घटनेची सर्व माहिती दिली. निक्की देवी हिने पूर्णियाचे एसपी उपेंद्रनाथ वर्मा यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली आहे.
यानंतर अधिकाऱ्यांनी हे प्रकरण कुटुंब समुपदेशन केंद्राकडे पाठवले आहे. कुटुंब समुपदेशन केंद्र आता याप्रकरणी पुढील कारवाई करणार आहे. पीडित महिला निक्की देवीने सांगितले की, तिच्या पतीने तिच्या नावावर जमिनीवर गृहकर्ज घेतले आहे, याशिवाय त्याने पत्नीच्या नावावर अनेक गट कर्जेही घेतली आहेत. सुमारे 10 लाखांचे कर्ज घेऊन तिचा पती फरार आहे. त्याचवेळी बँकेचा ईएमआय गेल्या 2 महिन्यांपासून दिला जात नसल्याने हप्ता मागणारे लोक घरी येऊन हप्त्यासाठी पीडितेचा छळ करत आहेत.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.